Sanjay Raut, Shambhuraj Desai saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai News : संजय राऊत इकडे या, तुमची सगळी व्यवस्था करताे ! शंभूराज देसाई

शंभूराज देसाईंनी आज साता-यात राऊत व उद्धव ठाकरेंवर टीका केली.

ओंकार कदम

Satara News : लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येवून राहावे आणि माझ्याविरोधात उभे राहून दाखवावे. त्यांच्या जेवण खाण्याची सगळी व्यवस्था मी करतो अशी खोचक साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर केली. गद्दारांचा भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण असेल या खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा मंत्री देसाईंनी आज (साेमवार) सातारा (Satara) येथे समाचार घेतला. (Maharashtra News)

मंत्री देसाई म्हणाले सत्तेत असतानाची अकार्यक्षमता झाकण्यासाठी आणि लोकांच लक्ष विचलीत करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मोर्चा आहे. सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली गेले ११ महिने काम करत आहे. यापुर्वी निर्विवाद वर्चस्व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं होतं. आता मुदती संपल्या आरक्षणाच्या आणि वाॅर्ड रचनेच्या संदर्भात न्यायालयिन प्रक्रीया सुरु आहे.

निवडणुका झाल्या नाही आत्ता प्रशासक आहे आणि आता ११ महिन्यांच्या कामकाजावर लगेच मोर्चा काढायची वेळ येणं म्हणजे आपण जे सत्ता असताना केलं नाही ते आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार करतय हे लोकांनी स्विकारलं आहे अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.

पहिला पाऊस झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री फिल्डवर आहेत प्रत्येक कामाची पाहाणी करु त्रुटी असतील त्या दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. आत्ता पर्यन्त झाली नव्हते ती कामं सुरु आहेत. मुंबई (mumbai) हे जागतीक दर्जाचं शहर निर्माण करण्याची अपेक्षा या ११ महिन्यातील सरकार पुर्ण करत आहे. हेच काम उद्धव ठाकरे करु शकले नाहीत यामुळं लोकांच लक्ष विचलीत करण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय असा आरोप देसाईंनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT