Shambhuraj Desai News : सत्तेत असल्यावर कायमच आम्हांला टार्गेट केलं जातंय. ज्या झाडाला फळ लागतात त्यालाच दगड मारली जातात. टार्गेट केले म्हणून आम्ही खचून जाणार नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. तेच आम्ही केलय यामुळे जे कोणी आमच्या जवळ येतील त्यांना सामावून घेण्याची आमची तयारी आहे असे साता-याचे पालकमंत्री शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले. (Maharashtra News)
देसाई म्हणाले दरम्यान कोणीही भाजप जवळ जात असेल आणि भाजप कोणाजवळ जात असेल तर याचा आमच्या महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आमचं बहुमत 185 पेक्षा जास्त जाईल असा विश्वासही शंभुराज देसाईंनी व्यक्त केला.
विरोधी पक्ष नेते अजित पवारांवर सुद्धा शंभुराज देसाई यांनी भाष्य करत अजित दादा आमच्या सोबत येण्याचा दिवस हे दादा किंवा आमचे वरिष्ठ सांगु शकतील. सध्या आमचं लक्ष मराठा आरक्षण (maratha reservation) हे आहे असे देसाईंनी स्पष्ट केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला सुद्धा शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देत पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला. ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पन्नास आमदार आणि तेरा खासदार सोबत ठेवले त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सोबत किती आमदार आहेत हे तपासुन पहावं अशी खरमरीत टिका शंभुराज देसाईंनी केली.
खारघर प्रकरणात मृतांची आकडेवारी लपवली जात आहे या असा आराेप खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर शंभुराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊत हे एसी ऑफिसमध्ये बसून बोलतात. शेतकऱ्यांचे नुकसान झाले म्हणून राऊतांनी कधी टाहो फोडला होता का असा सवाल देसाईंनी केला.
शेतकऱ्यांच्या बांधावरील कणभर माती कधी त्यांच्या पायाला लागली का. हवेतल्या गप्पा मारायच्या इतेकच राऊतांना माहितीये. अशा तथ्यहीन केलेल्या वक्तव्यावर बोलायला आम्ही बांधील नाही. राऊतांच्या झालेल्या तक्रारीवर शंभर टक्के पोलीस चौकशी करून कारवाई करतील असं ही शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.