गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २७ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. पण महाराष्ट्राला येत्या काही दिवसांत चक्रीवादळाचा थेट धोका नसला तरी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या मते पुढील 36 तासांत हे क्षेत्र तीव्र होऊन चक्रीवादळाचे स्वरूप धारण करू शकते. सध्या चक्रीवादळाचा धोका नाही. या चक्रीवादळामुळे 40-60 किमी/तास वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ नावाचे संभाव्य चक्रीवादळ सक्रिय आहे. हे चक्रीवादळ २३ ते २८ मे दरम्यान प्रभावी होऊ शकते. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमी आहे. पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्राला सध्या शक्ती चक्रीवादळाचा धोका नसल्याचे आयएमडीने वर्तवले आहे. पण पुढील ३६ तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास शक्ती चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. सध्या अटलांटिक महासागरात कोणतेही चक्रीवादळ नाही
IMD ने स्पष्ट सांगितले की, शक्ती चक्रीवादळाची शक्यता सध्या नाही, परंतु कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तीव्र पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. IMD ने ठामपणे सांगितले की, “सध्या ‘शक्ती’ नावाचे कोणतेही चक्रीवादळ नाही, आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्राला शक्ती वादळ धडकण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, IMD ने मच्छीमारांना २७ मे दरम्यान किनारपट्टी, दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक रहिवाशांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने कापणी पूर्ण करण्याचा आणि पाणी देणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीपासून सावध राहण्यास सांगितले आहे. पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील चक्रीवादळाचे नाव ठरविण्याची जबाबदारी नवी दिल्लीतील रिजनल स्पेशलाइज्ड मेटिऑरॉलॉजिकल सेंटरकडे(RSMC) आहे. हे नाव विश्व हवामान संघटना (WMO) आणि ESCAP च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निवडले जाते. राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या नाव ठरवण्यात येते. सध्याच्या यादीत ‘बिपरजॉय’, ‘तेज’, ‘हमून’, ‘मिधिली’ यांसारखी नावे समाविष्ट आहेत. यादीतील पुढील नाव ‘मोंथा’ हे आहे, जे थायलंडने सुचवले आहे. चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात ताशी 65 किमी वेगाने वारे वाहू लागल्यास नाव दिले जाईल.
चक्रीवादळ (Cyclone) हे एक शक्तिशाली वातावरणीय प्रक्रियेचा परिणाम आहे. हे चक्रीवादळ समुद्रावर तयार होते. चक्रीवादळ तयार होण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान किमान २६.५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असते. उष्ण पाण्यामुळे बाष्पीभवन वाढते आणि ते वादळासाठी इंधनाचे काम करते.
उष्ण पाण्यामुळे हवेत बाष्प वाढते, ज्यामुळे कमी दाबाचा (Low Pressure) भाग तयार होतो. हा कमी दाबाचा भाग आजूबाजूच्या हवेला आकर्षित करतो. त्याला गोलाकार गती मिळाल्यास चक्रीवादळात रूपांतर होते. उष्ण आणि दमट हवेमुळे ढग तयार होतात. यातून तीव्र वारे आणि मुसळधार पाऊस निर्माण होतो.
चक्रीवादळ धोकादायक आहे की नाही हे वाऱ्याच्या गती, पर्जन्यमान, समुद्राच्या लाटा आणि किनारपट्टीवरील स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. भारतात हवामान विभागाने (IMD) चक्रीवादळाचे स्वरूप खालीलप्रमाणे ठरवले आहे.
निम्न दाब क्षेत्र: 17-27 नॉट्स (31-49 किमी/तास)
चक्री वादळ: 28-33 नॉट्स (50-61 किमी/तास)
तीव्र चक्री वादळ: 34-47 नॉट्स (62-88 किमी/तास)
अतिशय तीव्र चक्री वादळ: 48-63 नॉट्स (89-118 किमी/तास)
अतितीव्र चक्री वादळ: 64 नॉट्सपेक्षा जास्त (119 किमी/तास किंवा अधिक)
89 किमी/तासपेक्षा जास्त गती असलेले वादळ धोकादायक मानले जाते.
चक्रीवादळामुळे अतिप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच तीव्रता जास्त असेल तर मनुष्यबळी जाण्याची शक्यता असेतच. नैसर्गिक आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. चक्रीवादळामुळे जनजिवन विस्कळीत होते. झाडांमुळे रस्ते अडू शकतात आणि नुकसान झालेल्या घरांना, वैद्यकीय साहित्यांनाही मदत करण्यास विलंब होऊ शकतो. वीज तारा, टेलिफोन टॉवर किंवा पाण्याच्या पाईप्सच्या दुरुस्तीला विलंब होऊ शकतो. दाट लोकवस्ती असल्यास चक्रीवादळाचा धोका जास्त होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.