satara , youth, shahupuri police, love
satara , youth, shahupuri police, love saam tv
महाराष्ट्र

Love : अख्या साता-यात रंगलीय त्याच्या प्रेमाची चर्चा

ओंकार कदम

Satara : बुरखा घालून आला प्रेयसीला भेटायला आलेल्या एका युवकास मुलं चोरणारा व्यक्ती म्हणून नागरिकांनी बदडल्याची घटना सातारा शहरात घडली आहे. दरम्यान संबंधित युवकाची माहिती नागरिकांनी पाेलीसांना दिली. त्यानंतर शाहपूरी पाेलीसांनी (police) युवकास (youth) ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केल्यानंतर खरा प्रकार समाेर आला. (Breaking Marathi News)

साताऱ्यातील तामजाईनगर येथे एक युवक बुरखा घालून प्रियसीला भेटायला आला हाेता. हा युवक मुलं चोरणारा असल्याचा संशय लोकांना आला. त्यामुळे त्यांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला पाेलीसांच्या स्वाधीन केले.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी सबंधित युवक हा बूरखा घालून तामजाईनगर परिसरातील शाळेचे नाव विचारत हाेता. एका दुकानदाराला त्याचा संशय आला. त्याने त्याला पकडलं. त्याची चाैकशी करण्यास प्रारंभ केला.

दरम्यान परिसरातील नागरिक तिथं जमले. बुरखा परिधान केलेली महिला नसून पुरुष असल्याचे लक्षात येताच मुले पळवायला आला की काय अशा संशय आल्याने नागरिकांनी त्याला चाेपलं. त्यानंतर युवकास शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

पोलिसांनी त्याची चाैकशी केली. प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु त्याला पाेलीसी खाक्या दाखवताच तो प्रेयसीला भेटायला आल्याचे सांगितलं. प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघेही विवाहित आहेत. प्रियसीला वेश बदलून येणे या प्रियकराला चांगलेच महागात पडले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : काँग्रेसने अदानी-अंबानीकडून किती पैसा घेतला? PM मोदींची टीका

Dance Viral Video: कॉलेज फेस्टमध्ये डान्स करता करता मुलीनं शर्ट काढून फेकला; VIDEO व्हायरल, नेटकरी भडकले

Bhandara News: धावत्या बसमध्ये प्रवाशानं सोडला जीव; भोवळ आल्यावरच बस हॉस्पिटलला नेण्याची केली विनंती, पण कंडक्टर अडून बसला

Maharashtra Politics : काँग्रेस मजबूत, तर देश मजबूत होईल; शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Nashik Crime News : गुन्हेगार मित्रांची संगत नडली, नाशिकमध्ये ६ जणांसह ८७ गुंड तडीपार

SCROLL FOR NEXT