shahu chhatrapati maharaj on ram mandir inaguration saam tv
महाराष्ट्र

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर हा आनंदाचा क्षण : शाहू छत्रपती

राजघराण्यातील मान्यवरांनी एकत्र येत श्रीरामाची आरती आणि पूजा केली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

राम मंदिर हा आनंदाचा क्षण अशी भावना आज (साेमवार) शाहू छत्रपती महाराज यांनी काेल्हापूर येथे व्यक्त केली. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात पंच सुक्त पोमण अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शाहू छत्रपती महाराज यांनी साम टीव्हीशी संवाद साधला.(Maharashtra News)

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा निमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात (ram mandir) राजघराण्यातील मान्यवरांनी पूजा केली. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati), मालोजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती तसेच मान्यवर उपस्थित हाेते. या सर्वांनी एकत्र येत आरती आणि पूजा केली.

यावेळी शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी राम नवीन नाही अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय छत्रपती घराण्यात आजपर्यंत 4 छत्रपतींना राजाराम हे नाव देण्यात आले आहे. यावरूनच या घराण्याची रामभक्ती दिसून येते असेही त्यांनी नमूद केले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले राम मंदिर हा आनंदाचा क्षण आहे. मी 1956 साली आपण 8 वर्षांचा असताना अयोध्येत गेलो होतो. त्यानंतर जाण्याचा योग आला नाही आता भविष्यात आला तर नक्की जाईन असेही शाहू छत्रपती महाराज यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT