Shahapur Batsa river Tragedy saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचवायला आईनं मारली उडी, नंतर भाचीही पाण्यात उतरली; तिघांचाही करूण अंत

Shahapur Tragedy News : भातसा नदीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मायलेकासह भाचीचा करूण अंत झाला आहे. जीवरक्षक पथकाच्या सदस्यांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले.

Nandkumar Joshi

फय्याज शेख, शहापूर

भातसा नदीत अंघोळीसाठी उतरलेला मुलगा बुडत असल्याचं पाहून त्याच्या आईनंही उडी मारली. ती देखील बुडू लागल्यानं काठावर असलेल्या भाचीनंही पाण्यात उडी मारली. मात्र, बाहेर पडला न आल्यानं तिघांचाही बुडून मृत्यू झाला. शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे येथे ही दुर्दैवी घटना घडली. जीवरक्षक पथकाच्या मदतीनं मायलेकासह भाचीचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कपडे धुवायला नदीवर गेले अन् विपरीत घडलं

शहापूर तालुक्यातील गोठेघर वाफे येथील भातसा नदीवर वनिता सुदर्शन शेळके (वय,३३, राहणार- वाफे), लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५०, रा. चेरपोली) या दोन महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत धीरज दत्तात्रय पाटील (वय, १५, राहणार चेरपोली) हा देखील गेला होता.

उन्हाचा तडाखा असल्याने धीरज अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. त्याला खोलीचा अंदाज आला नाही. तो बुडू लागला. ते बघून आईने त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी मारली. पण ती सुद्धा बुडू लागली. दोघेही बुडत असल्याचे भाचीने बघितले. तिनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, तिघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला.

परिसरात हळहळ

आईसह मुलगा आणि भाचीचाही नदीत बुडून मृत्यू झाल्यानं कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली. भातसा नदीत तिघे बुडाल्याची माहिती पोलीस आणि जीवरक्षक पथकाच्या सदस्यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नदीपात्रात शोध घेतला. काही वेळाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मायलेकासह भाचीचा मृतदेह बघून गावातील प्रत्येकाचं मन हेलावून गेलं. या तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उप जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT