Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : नदी ओलांडताना आला अचानक पाण्याचा लोंढा; चिमुकलीला वाचविताना इसम पाण्याच्या प्रवाहात गेला वाहून

Shahapur News : शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीतील हि घटना आहे. सायंकाळची वेळ असल्याने अनेकजण कामाहून घरी परतत असतात. त्यानुसार शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावी वैतरणा नदी ओलांडून अनेकजण घरी जात होते

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : वैतरणा नदीतून जात असताना धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा लोंढा अचानकपणे आला. यामुळे नदीतीळ पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेले होते. दरम्यान यात एका सात वर्षीय मुलीचा समावेश होता. मात्र मुलीला नदीच्या काठावर सुखरूप बाहेर काढले. मात्र त्याला बाहेर निघत न आल्याने मुलीला वाचविणारा आद्यपही बेपत्ता आहे. 

शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीतील हि घटना आहे. सायंकाळची वेळ असल्याने अनेकजण कामाहून घरी परतत असतात. त्यानुसार शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावी वैतरणा नदी ओलांडून अनेकजण घरी जात होते. याच वेळी मध्य वैतरणा धरणाचे पाणी पुर्व सुचना न देता नदीत सोडण्यात आले. याच वेळी नदी ओलांडत असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने या प्रवाहत भास्कर पाधीर व एक सात वर्षाची लहान मुलगी असे दोन जण वाहून गेले. प्रसंगावधान राखत भास्कर पाधीर यांनी लहान मुलीला आपल्या खांद्यावर बसून नदीकाठी असलेल्या ग्रामस्थांच्या स्वाधीन केले. मात्र नदीच्या अति पाण्याचा प्रवाहामुळे भास्कर पाधीर हा नदीत वाहून गेला. आज सकाळपासून सावर्डे गावातील लोक भास्करचा शोध घेत आहेत. मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही. 

कोणतीही सूचना न देता सोडले पाणी 

अखेर गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकरी मध्य वैतरणा धरणाच्या दिशेने निघाले असून धरणाच्या गेटजवळ आंदोलन  करणार असल्याचे समजते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानक मध्य वैतरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fake Lady Police Arrested: पुण्यात 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश! तरुणीकडून दोन पोलिस गणवेश जप्त

पिंपल्स आणि काळे डाग होतील गायब! ग्लोईंग स्किनसाठी घरीच करा संत्र्याच्या पावडरचा जादुई उपाय

Maharashtra News Live Update: दूषित पाणीपुरवठा विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

Famous Actress : दिग्दर्शकाचं किळसवाणं कृत्य; प्रसिद्ध अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श, घाबरून बॉलिवूड इंडस्ट्री सोडली

Shocking : बीड हादरलं! दोन तरूणांकडून तरुणीवर बलात्कार; एकानं लॉजवर नेलं, दुसऱ्यानं गुंगीचं औषध दिलं, ब्लॅकमेल करून सोनंही लुटलं

SCROLL FOR NEXT