Shahapur News  Saam tv
महाराष्ट्र

Shahapur News : पाच मित्रांपैकी दोन जण वाहून गेले, एकाचा मृत्यू; वैतरणा धरणावर पार्टीसाठी गेले असताना घडली घटना

Shahapur News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वैतरणा धरणाच्या गेटवर स्थानिक नागरिकांना जंगलात जनावरे चारण्यासाठी मनाई केली जाते.

Rajesh Sonwane

शहापूर : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. दारूची पार्टी करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोन जण वाहून गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने एकाला वाचविण्यात यश मिळाले. मात्र एकाचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वैतरणा धरणाच्या गेटवर स्थानिक नागरिकांना जंगलात जनावरे चारण्यासाठी मनाई केली जाते. मात्र बाहेरील लोक येथे दारू व मटणाची पार्टी करण्यासाठी गेटमधून धरणाच्या खाली कसे सोडले जातात; असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मध्य वैतरणा धरणावर जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे गेट आहे. हे गेट ओलांडून पुढे धरणाच्या खाली जावे लागते. 

दरम्यान नाशिकहून पाच मित्र दारू व मटणाची पार्टी करण्यासाठी रविवारी दुपारी धरणाच्या खाली गेले होते. संध्याकाळी धरणाच्या वाहत्या पाण्यात उतरल्याने पाच मित्रांपैकी दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. वाहून गेलेल्या दोन जणांपैकी स्थानिक नागरिकांनी एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढले. तर एकाचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

Urmila Matondkar: जणू बार्बीडॉलच! वयाच्या ५१ व्या वर्षी उर्मिला मातोंडकरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहून विश्वास बसणार नाही!

SCROLL FOR NEXT