Shahapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये उबाठाचे दोन गट; मविआच्या उमेदवाराची अडचण, नाराजांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Shahapur News : शहापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून माजी आमदार पांडुरंग बरोरा निवडणुकीच्या रिंगणात आहेत

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : विधानसभा निवडणुकीत बंडखोरीने बहुतांश मतदारसंघात एकाच पक्षाचे दोन गट पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार शहापूर मतदारसंघात देखील चित्र पाहण्यास मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात दोन गट असून एक गटाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. तर दुसरा गटाने उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

शहापूर (Shahapur) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून माजी आमदार पांडुरंग बरोरा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु ही जागा महाविकास आघाडीने ठाकरे गट शिवसेनेला न सोडल्याने ठाकरे गट शिवसेनेच्या (Shiv Sena) काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून येथे अपक्ष उमेदवार उभा केला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचण निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या एका गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी व महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी शहापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना पाठींबा जाहीर केला आहे.

नाराज गट अपक्षाच्या साथीला 

शहापूर मतदारसंघाची जागा शिवसेना उबाठा गटाला न मिळाल्याने येथील काही पदाधिकारी नाराज झाले आहेत. यामुळे मतदारसंघात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे. ठाकरे गटातील हा नाराज गट अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी उभा राहिला आहे. यामुळे शहापूरमध्ये चुरशीची लढाई पाहण्यास मिळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT