Shahapur News Saam TV
महाराष्ट्र

Shahapur News: मृत्यूची वाट! रस्त्याअभावी गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास; वाटेतच झाली प्रसूती

Shahapur Road Problem: गावात रस्ता नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Ruchika Jadhav

फय्याज शेख

Shahapur News:

राज्यात एकीकडे शहरांमध्ये गगनचुंबी इमारती बांधल्या आहेत. तर दुसरीकडे खेड्यापाड्यांत रस्त्यांचीही सुविधा नाही. गावात रस्ता नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका गर्भवती महिलेला झोळीतून घेऊन जाताना वाटेतच तिची प्रसूती झालीये. (Latest Marathi News)

शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पटकीचा पाडा या आदिवासी पाड्यात ही घटना घडली आहे. येथे जाण्यासाठी रस्ता नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी सुरू आहे. मात्र अद्यापही रस्ता बांधण्यात आलेला नाही.

रस्ता नसल्याने येथील रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रविवारी सकाळी ११ वाजता गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागल्याने तिला कसारा रूग्णालयात दाखल करायचे होते. मात्र रस्ता नसल्याने कापडाची झोळी करून तिला नेण्यात येत होते. आजूबाजूला जंगल असलेल्या रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली.

महिलेने बाळाला जन्म दिल्यावर तिला आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावात रस्ता नसल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक व्यक्तींचा बळी गेला आहे. शहापूर तालूक्यातील हे गाव मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र तरीही तेथे अद्याप कोणत्याही प्रकारच्या सुविधा करण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा...विराट कोहली-अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या दरबारी; VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update:- कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यात मिळाला पावसाळ्याचा अनुभव

Vande Bharat Express : मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा सुधारित वेळ काय?

रिलायन्स कम्युनिकेशन्स कर्ज घोटाळा प्रकरण; २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक, CBIची मोठी कारवाई

Mango for diabetics: डायबेटिस रुग्णांनी आंबा खावा की नाही? डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर

SCROLL FOR NEXT