Kasara Ghat Saam tv
महाराष्ट्र

Kasara Ghat : मोठा अपघात टळला; प्रवाशांचा जीव मुठीत, जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना बचावली

Shahapur News : चाक अधिक खोलात गेले असते तर हि बस खोल दरीत कोसळली असती. नशीब चांगले म्हणून बस दरीत कोसळलतांना वाचली आहे

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : मुंबई- नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना थोडक्यात बचावली आहे. यामुळे मोठा अपघात टळला आहे. बसचे मागील चाक रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाला असून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र या अपघातानंतर बसमधील प्रवासी घाबरले होते. 

मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने घाटातील रस्ता काही ठिकाणी खचलेला आहे. दरम्यान मुंबईहून संभाजीनगर येथे आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्स कसारा घाट (Kasara Ghat) रस्त्यातून मार्गस्थ होत असताना रस्ता खचलेल्या ठिकाणी बस आली असता बस स्लीप झाली. याठिकाणी खॊल अशी दरी आहे. चाक अधिक खोलात गेले असते तर हि बस खोल दरीत कोसळली असती. नशीब चांगले म्हणून बस दरीत कोसळलतांना वाचली आहे. यामुळे बसमधील प्रवाशी देखील सुखरूप आहेत.  

दरम्यान महामार्गावरील कसारा घाटतील आंबा पाॅईटजवळ रस्ता खचला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या खचलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र अद्याप देखील या कसारा घाटतील खचलेल्या रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही. हे काम सुरू असलेल्या ठिकाणी बस आली असता मागील चाक खचले. बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र या बेजबाबदार ठेकेदार गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT