Shahapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Vidhan Sabha : मातोश्रीचा आदेश आला तरी माघार नाही; शहापूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपसले बंडाचे हत्यार

Shahapur News : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटाला झूकते माप दिल्याने ग्रामीण भागातील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चित्र सगळीकडेच निर्माण झाले आहे. अर्थात सर्वत्र बंडखोरी सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसारच शहापूर मतदारसंघात देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले असून मातोश्रीचा आदेश आला तरी माघार नाही वेळ पडल्यास राजीनामे देऊ; अशी भूमिका घेतली आहे. 

ठाणे (Thane) जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटाला झूकते माप दिल्याने ग्रामीण भागातील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळे शहापूर (Shahapur) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत विधानसभा लढणार असल्याचे ठाम मत केले आहे. जर मातोश्री हून आदेश आला तरी देखील माघार घेणार नाही; असे ठाम मत आजच्या बैठकीत घेण्यात आले. यामुळे शहापूरमध्ये अर्ज माघारीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अविनाश शिंगे निवडणुकीच्या रिंगणात 

शहापूर तालुक्यात १४ जिल्हा परिषद जागे पैकी ९ सदस्य व २८ पंचायत समितीचे १९ सदस्य हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे असताना ६० टक्के ग्रामपंचायत हे उद्धव ठाकरे यांचे कडे असता जर शहापूर विधानसभेची जागा ही शहापूर (Shiv Sena) शिवसेना उद्धव ठाकरे यांना देणे गरजेचे होते. मात्र असे झाले नाही म्हणून अविनाश शिंगे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai-Pune : अंधाऱ्या बोगद्यातून वाट काढत पोहचा 'या' धबधब्यावर, मुंबई-पुण्याजवळच पाहाल हे आरस्पानी सौंदर्य

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT