Shahapur News Saam tv
महाराष्ट्र

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shahapur News : २७ जुलैला पहाटे मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा झाला. काही ठिकाणी वाऱ्यामुळे पडझड देखील झाली आहे. पाऊस व वारा असल्याने दुंदा निमसे हे आपल्या बेडेघरात गाढ झोपी गेलेले होते

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. यातच शहापूर तालुक्यातील अल्याणी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे बेडेघर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत बेडाघरात असलेल्या शेतकऱ्याचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अन्य कोणी नसल्याने ते बचावले आहेत.  

शहापूर तालुक्यातील अल्याणी येथे सदरची घटना घडली असून शेतकरी दुंदा मल्हारी निमसे (वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान परिसरात २७ जुलैला पहाटे मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा झाला. काही ठिकाणी वाऱ्यामुळे पडझड देखील झाली आहे. पाऊस व वारा असल्याने दुंदा निमसे हे आपल्या बेडेघरात गाढ झोपी गेलेले होते. याच वेळी बेडेघर कोसळले. यामध्ये ते दबले गेले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  

कुटुंबीय शेतात आल्यानंतर घटना उघड 

अल्याणी गावातील शेतकरी दुंदा निमसे हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतावर आसलेल्या बेडाघर येथे जेवण आटपून झोपण्यासाठी गेले होते. नेहेमी प्रमाणे ते झोपले. मात्र पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रात्रीच्या सुमारास अचानक बेडाघर कोसळले. बेडा घरात झोपलेले दुंदा निमसे हे दाबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातच्या कामानिमित्ताने त्यांच्या कुटुंबातील सदस्य गेले असता सदरची घटना उघडकीस आली.  

शेतात गेल्यानंतर बेडाघर कोसळलेले दिसून आले. त्याखाली दुंदा निमसे हे दाबले गेल्याचे दिसून आले. त्यावेळी घरातील लोकांना बोलावून त्यांना बाहेर काढले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. सदर आपत्कालीन घटनेची दखल शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घेतली असून घटनास्थळाचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ३ सदस्यीय संयुक्त चौकशी समितीची नियुक्ती

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT