Sapgaon Bridge Saam tv
महाराष्ट्र

Sapgaon Bridge : भातसा नदीवरील सापगाव पूल वाहतुकीसाठी बंद; पोलिस कर्मचारी तैनात

Shahapur News : भातसा नदीवरील असलेला सापगाव पूल हा कालबाह्य झाला असून यावरून वाहतूक करणे धोक्याचे असल्याने पुलाची तपासणी होत नाही तोपर्यंत पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
शहापूर
: शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर नदीला मोठा पूर आल्याने सापगाव पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे दोन दिवसांपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान रात्री उशिरापर्यंत सापगाव पूला वरील पाणी ओसरले असले तरी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

शहापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला पुर आल्याने सापगाव पूल पाण्याखाली गेला होता. परिणामी मुरबाड माळशेज घाट तसेच निम्मे हून अधिक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. आता सध्या हा पूल पुर्णपणे कमकुवत झाले आहे यावरून वाहतूक सुरू करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. यामुळे प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूल काही वर्षांपूर्वीच कालबाह्य 

सापगाव येथील भातसा नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. इतकेच नाही तर हा पूल काही वर्षांपूर्वीच कालबाह्य झाले आहे. याची तपासणी करून MSRDC कडे नवीन पूलाचे बांधकाम सोपविण्यात आले होते. मात्र चार- पाच वर्षे उलटून गेल्यानंतर देखील नवीन पूलाचे बांधकाम सुरु करण्यात आलेले नाही. परिणामी कालबाह्य झालेल्या पुलावरूनच वाहतूक सुरू होती. रस्ता व पूल व्हावे याकरिता अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन काही हलले नाही. 

तपासणी होईपर्यंत पूल बंद 

दरम्यान भातसा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. पुलावरील पाणी सध्या ओसरले असले तरी नदीला पूर कायम आहे. यामुळे जोपर्यंत पूलाची तपासणी केली जात नाही; तोपर्यंत पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पूलावरून कोणी वाहतूक करू नये; म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasad Oak: 'शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं...'; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची 'शतकपूर्ती', अभिनेता म्हणाला...

India Vs Pakistan Match: ठाणे येथील हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, भारत-पाक मॅच सुरू असताना टीव्ही फोडले; पाहा VIDEO

'१० मिनिटांत तयार हो, तुझ्यासोबत शरीरसंबंध..' CMOकडून महिला डॉक्टरवर जबरदस्ती, शेवटी हार्ट अटॅकनं मृत्यू

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा

Navratri Upvas: नवरात्रीचा उपवास कधी सोडावा?

SCROLL FOR NEXT