Shahapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Shahapur News : विधानसभा निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होण्यास सुरुवात झाली

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : शहापूर विधानसभेत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या भेटीनंतर बबन हरणे व त्यांच्या समर्थकांनी एक मताने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहापूर मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद वाढण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होण्यास सुरुवात झाली आहे. शहापूर तालुक्यातील बबन हरणे समर्थकांनी आज शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने मेळावा घेत शरदचंद्र पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) उमेदवाराला पाठिंबा देण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

शहापूर तालुक्यातील ७५ टक्के मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याने बरोराचा विजयाचा रथ कोणालाही रोखता येणार नाही; असे चित्र दिसू लागले आहे. बबन हरणे म्हणजे काळू व शाई धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारे शेतकरी तसेच मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिले आंदोलन उभारणारे शेतकरी आहेत. त्यांनी उठाव करत वाढीव रक्कम शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT