Kasara Ghat Accident Saam tv
महाराष्ट्र

Kasara Ghat Accident : नवीन कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनर दरीत कोसळला, पाच ते सहा जण अडकले

Shahapur News : नवीन कसारा घाटातील बलगर पाॅईटजवळ हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर कसारा घाटात आल्यानंतर घाट रस्त्यावर उतार असल्याने कंटेनर चालकाचा ताबा सुटला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

शहापूर : शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर कसारा घाटातील खोल दरी कोसळला आहे. या कंटेनरमध्ये पाच ते सहा जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी कसारा पोलिस आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य असुन दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

नवीन कसारा घाटातील (Kasara Ghat) बलगर पाॅईटजवळ हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर कसारा घाटात आल्यानंतर घाट रस्त्यावर उतार असल्याने कंटेनर चालकाचा ताबा सुटला. यात कंटेनर थेट घाटातील खोल दरीत कोसळला. या कंटेनरमध्ये पाच ते सहाजण प्रवास करत असल्याचे समोर आले असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

दरम्यान (Accident) अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केले आहे. यात आतापर्यंत तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना कसारा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यात एका लहान मुलाचा समावेश आहे. तर चार जण खाली अडकल्याची माहिती समोर येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT