Shahajibapu Patil and Uddhav Thackeray SAAM TV
महाराष्ट्र

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरेंची नक्कल, खिल्लीही उडवली; डोंगर, झाडीच्या टीकेला शहाजीबापू पाटलांचं प्रत्युत्तर

Shahajibapu Patil Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची नक्कल करून दाखवतानाच, शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस असल्याची टीकाही त्यांनी पंढरपूरच्या सभेत केली.

भारत नागणे

Pandharpur : सांगोला येथे उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हिंदुहृदयसम्राटांचं पोरगं बिनकामाचं असून, कवायती करतात, अशी टीका करतानाच, स्टेजवरच त्यांची नक्कल करून दाखवली.

गुवाहाटीचा डोंगर बघितला, त्यांना आता रायगड किल्ल्यावरील टकमक टोक दाखवायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटावर केली होती. या टीकेला आता शहाजीबापूंनी प्रत्युत्तर दिलं. हिंदूहृदयसम्राटांचं पोरगं बिनकामाचं असल्याची टीका त्यांनी केली. याशिवाय स्टेजवरच उद्धव ठाकरेंच्या भाषणशैलीची नक्कलही करून दाखवली.

पंढरपूरमध्ये सांगल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि उमेदवार शहाजी बापू पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. हिंदूहृदयसम्राटाचं पोरगं बिनकामाचं अशी टीका केली. उद्धव ठाकरे स्टेजवर आल्यावर कवायती करतात. बिनकामाचा माणूस आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे एकदाही तोंड बघितले नाही. आमदार म्हणून आमची लायकी काय ठेवली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे स्टेजवर आल्यावर कवायती करतात, हे सांगत असताना शहाजी बापू यांनी स्टेजवरच त्यांची नक्कल करून दाखवली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांची नुकतीच सांगोला येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत उद्धव यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर कडाडून टीका केली होती. गुवाहाटीचा डोंगर ज्यांनी बघितला, त्यांना रायगडाचे टकमक टोक दाखवायचे आहे. रेल्वेमध्ये ओळख असल्यास मला २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्यावे, एकाला तिकडे पाठवायचंय, अशी उपहासात्मक टीकाही उद्धव यांनी केली होती. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापूंसह शिंदे गट आणि अमित शहा यांच्यावरही टीकेची तोफ डागली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल

Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT