Police and election squad conduct a detailed search at Shahaji Bapu Patil’s Sangola office, intensifying the BJP–Shinde Sena political clash. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काय डोंगर, काय झाडी, आता शहाजीबापूंवर धाडी,भाजपनं आवळला शिंदेसेनेभोवतीचा फास

BJP Shinde Sena Clash During Maharashtra Municipal Elections: काय डोंगर, काय झाडी असा डायलॉग मारणारे शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकलीय. यावरुन शिंदेसेना-भाजप पुन्हा आमनेसामने आलेत. युतीधर्मावरुन कसं राजकारण तापलंय..

Bharat Mohalkar

ही दृश्ये आहेत शिंदेसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मारलेल्या छापेमारीची.... शहाजी बापूंची सभा संपली आणि पोलिसांचं पथक थेट शहाजीबापू पाटलांच्या ऑफिसमध्ये घुसलं आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगसह चौकशी सुरु केली... यावरुन शहाजीबापू पाटलांनी उद्विग्न होत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि दीपक पाटलांवर हल्लाबोल केलाय.

शहाजीबापू पाटलांनी भाजपविरोधात वक्तव्य केल्यानंच ही धाड टाकण्यात आल्याची शंका शिंदेसेनेनं उपस्थित केलीय... तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र सत्ताधारी आणि विरोधक पाहून कारवाई होत नसते, असं म्हणत शिंदेसेनेचा आरोप फेटाळून लावलाय..

खरंतर या धाडसत्राची सुरुवात झाली ती निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर मारलेल्या छाप्यामुळे... कारण याच छाप्यानंतर हिंगोलीत आपल्या घरी 100 पोलिसांनी पहाटेच धाड टाकल्याचा आरोप संतोष बांगरांनी केला.. तर एवढंच नाही तर सिडकोच्या 4500 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करुन संजय शिरसाटांना खिंडीत गाठलंय.. मात्र या संघर्षाचं खापर भाजपनं शिंदेसेनेच्या माथ्यावर फोडलंय...

ऐन नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीत संघर्ष पेटणं हे सत्तेच्या स्पर्धेत फक्त महायुतीतीलच पक्ष आहेत, इतर पक्षांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं, यासाठीची खेळी आहे की खरंच महायुतीतील संघर्ष टोकाला गेलाय? हे निवडणुकीच्या निकालातील गणिताने स्पष्ट होणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीच ठरलं! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

मोठी बातमी! BMC साठी भाजपकडून ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणा-कुणाला दिली संधी?

Railway Fire : धावत्या ट्रेनला भीषण आग, २ डबे जळून खाक; एकाचा मृत्यू तर अनेक जण होरपळले; थरारक VIDEO समोर

Paneer Bhurji Recipe : नाश्ता अन् जेवणासाठी झटपट बनवा ढाबा स्टाईल पनीर भुर्जी

FSSAI Recruitment: ग्रॅज्युएट आहात? FSSAI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? वाचा

SCROLL FOR NEXT