जयेश गावंडे
अकोला : शहरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी Police छापेमारी करून संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे. अकोला Akola शहरातील मलकापुर Malkapur शहरातील साईं अर्पाटमेटमध्ये हा कुंटणखाना सुरु होता. याची माहिती अकोला पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई केली आहे. Sex racket exposed in Akola
याप्रकरणी पीडित महिलांसह ५ आरोपी विरोधात खदान Khadan पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापुर परिसरातील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना मलकापुर परिसरात अवैध रॅकेटचा व्यापार चालत आहे, अशी तक्रार केली होती. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने मलकापुर परिसरातिल ३ मजली इमारत साईं रेसिडेन्सी Sai Residency मधील रूम नं २०४ मध्ये बनावट ग्राहक पाठवले.
हे देखील पहा
या ठिकाणी सेक्स रॅकेट चालत याची खात्री केली. त्याठिकाणी घरमालक व १ घरमालकिन यानी २ तरुणीना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री करण्याकरिता आणले होते. घरमालक महिलाही एका मुलीचे एका तासाचे १ हजार रुपये व एका रात्रीचे २ हजार रुपये मोबदला घेवून, त्यातील मुलींना काही रुपये देवुन कुंटनखाना चालवित असल्याचे दिसून आले आहे. विशेष पथकाने सायंकाळी ५ वाजता छापा मारला आहे. Sex racket exposed in Akola
कुंटनखाना चालविणारा मालक, एक महिला मिळून आली व देहविक्री करणाऱ्या इतर २ मुलींना मिळून आले आहे. कारवाई दरम्यान १ ग्राहक पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. या वेळी पोलिसांना एकूण ३ महिलांनकडून ४ हजार ५१० रुपये, १ मोटारसायकल, २ मोबाइल असा एकूण ८५ हजार १० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल आहे. या प्रकरणी कुंटनखाना चालविनारा उमेश दिनकर म्हस्के (रा.अकोला), शुभम खांडेकर (रा. अकोला) व ३ महिला यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५, ९ नुसार खदान पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पकडण्यात आलेल्या तरुणींमध्ये अकोला जिल्ह्यासह मुंबई Mumbai येथील तरुणींचा समावेश आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.