Accident news Saam Tv News
महाराष्ट्र

Road Accident: संभाजीनगरत भीषण अपघात, पिकअपची ट्रॉलीला धडक, आगीचा भडका उडाला, दोघांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगावजवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप धडकली. या भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.

Bhagyashree Kamble

उभ्या ट्रॅक्टर ट्रोलीला पिकअपनं जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पिकअप गाडीने पेट घेतला. पिकअप गाडीत आगीचा भडका उडाल्यानं चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर, पिकअप गाडीमध्ये उपस्थित असलेल्या दुसर्‍या व्यक्तीचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगावजवळ घडली आहे.

रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गल्लेबोरगावजवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप धडकली. या भीषण अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगाव जवळ हा अपघात घडला असून, तिघंही सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातात ५१ वर्षीय विनायक जालिंदर पाटील आणि ३५ वर्षीय दादा साहेब बाजीराव देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर, सलीम मुलानी हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील तासगांव येथून मृत विनायक पाटील, दादा साहेब देशमुख आणि सलीम मुलानी हे तिघंही पीकअप वाहन घेऊन मंडप डेकोरेशनचे सामान आणण्यासाठी इंदौर येथे निघाले होते.

महामार्गावरील गल्लेबोरगाव येथील पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्यानं रस्त्याच्या कडेला ट्रोली उभी होती.

या ट्रॉलीला पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपच्या केबिनचा चक्काचूर झाला. ज्यात चालक विनायक पाटील आणि दादासाहेब देशमुख हे दोघेही फसले. यातच वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी पाठीमागे बसलेले जखमी सलीम मुलानी यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. तसेच देशमुख यांना बाहेर काढले. मात्र, देशमुख यांचा रूग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. तर, चालक पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT