Ambernath : अंबरनाथमध्ये 72 वर्षांच्या काकांनी घराच्या छतावरतीच फुलवला भाजीचा मळा अजय दुधाणे
महाराष्ट्र

Ambernath : अंबरनाथमध्ये 72 वर्षांच्या काकांनी घराच्या छतावरतीच फुलवला भाजीचा मळा

शेतीची आवड असलेल्या एका 72 वर्षांच्या काकांनी आपल्या घराच्या छतावर भाजीचा मळा फुलवला आहे. शिवराम भिसे (Shivram Bhise) असं त्या काकांचं नाव असून या आजोबांची घरगुती शेती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : शेतीची आवड असलेल्या एका 72 वर्षांच्या काकांनी आपल्या घराच्या छतावर भाजीचा मळा फुलवला आहे. शिवराम भिसे (Shivram Bhise) असं त्या काकांचं नाव असून ते वडवली परिसरात राहतात, आजोबांची घरगुती शेती चांगलीच प्रसिद्ध झाली असून,परिसरातील अनेक नागरिक शेती पाहण्यासाठी त्यांच्या घरी गर्दी करत आहेत.

कोरोनामुळे (Corona) निर्माण झालेल्या लॉकडाऊन काळात घरी बसून काय करावे असा प्रश्न अनेकांसमोर होता. यावेळी अंबरनाथच्या (Ambernath) शिवराम भिसे काकांनी घराच्या गच्चीचा अतिशय सकारात्मक पद्धतीनं वापर करत घराच्या गच्चीवर भाजीपाल्याचा मळा फुलवला आहे. 72 वर्षांचे भिसे काका, अंबरनाथच्या वडवली परिसरात वास्तव्याला आहेत, लॉकडाऊन च्या काळात भाजीपाला मिळणेही दुरापास्त झाल्याने त्यांनी घरी असलेल्या भाजीपाल्याचा भाजीपाल्याचा बिया कुंडीत लावल्या, त्यानंतर लावलेली रोप फार मोठी झाली आणि त्यांना भाजीपाला लागल्यानंतर हा जणू काही काकांचा हा छंद बनवला.

यानंतर त्यांनी त्यांच्या घराचा संपूर्ण गच्ची भाजीपाल्याची लागवड केली त्यानंतर अनेक ठिकाणचा नर्सरी फिरून त्यांनी अनेक प्रकारचा फळभाज्या आणि पालेभाज्या घरी लागवड करण्यासाठी आणल्या तर घरचा भाजीपाला मधून निघणारा कचरा एकत्रित करून जैविक तयार करून, भाजीपाल्याचा लागवडीसाठी वापर केला.

या भाज्यांना घरच्या घरी तयार केलेलं लेंडी खत, शेणखत, चहा केल्यानंतर उरणारी चहा पावडर घालून त्यांनी झाडे वाढवली, झाडांना दिवसातून तीन वेळा पाणी देणे, झाडांचे योग्य ती निगा राखणं, वेळच्यावेळी झाडांची छाटणी करणं अशी कामं विषय भिसे काका हे अतिशय लक्षपूर्वक करत असतात,या सगळ्या कामात काकांना त्यांच्या कुटुंबियांचे देखील मोठी साथ मिळाली आहे.

हे देखील पहा -

भिसे काकांनी लॉकडाऊन च्या काळात छंद म्हणून भाजीपाल्याची लागवड सुरू केली मात्र इतक्यावरच न थांबता त्यांनी हा भाजीपाला आपल्या शेजारपाजारच्या लोकांनाही मोफत घरपोच मिळवून दिला आणि संपूर्ण भाजीपाल्याची शेती सेंद्रिय असून त्यात केमिकल्सचा वापर कटाक्षाने टाळला जातो शिवाय यामध्ये आणखी काय नवीन गोष्टी करता येतील यासाठी भिसे आजोबा युट्युब वर देखील बरीच शोधाशोध करत असतात रिटायरमेंट नंतर मिळालेल्या फावला वेळ आणि त्यातच लागलेला लॉंग डाऊन याचा अतिशय चांगला उपयोग केला आहे.

आता त्यांचा हा घरगुती भाजीपाल्याचा मळा बघण्यासाठी अनेक लोक त्यांच्या घरी भेट देत आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या घरात किंवा सोसायटीच्या आवारात असा एखादा प्रयोग करायला हरकत नाही अस स्थानिक म्हणत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT