Aurangabad accident  Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये दोन अपघातात सात जणांचा मृत्यू, १० जखमी

औरंगाबाद-जालना महामार्गावर बोलेरो जीप आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या दोन अपघातात (Seven People died) सात जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद ते जालना महामार्गावर बोलेरो जीप आणि एसटी बस अपघातात (Accident) पाच जण ठार झाले. तर वाळुज कडून गंगापूर कडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस (Police) घटनस्थळी दाखल होऊन जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस आणि पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला. औरंगाबादवरून जालनाकडे जाणारी एसटी महामंडळाची बस दुभाजकावरून बाजूच्या रस्त्यावर गेली. त्यानंतर समोरुन येणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅन चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली.

त्यानंतर पिकअपमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून बसमध्ये प्रवास करणारे सहा ते सात प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जालना महामार्गावरील गाढेजळगाव फाट्याजवळ झाला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT