El Nino very strong in September : सप्टेंबर महिन्याची सुरुवात होत असतानाच देशावर पावसाचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी हवामान संस्था 'स्काईमेट'ने (Skymet) २०२६ च्या पावसाचा आपला आधीचा अंदाज अचानक बदलला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल ७० टक्के दुष्काळाचा धोका हवामान विभागाने व्यक्त केला आहे.(September 2026 rainfall forecast for Maharashtra)
'एल निनो'ची (El Nino) स्थिती प्रचंड मजबूत होत असल्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर कमालीचा घटेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा थेट फटका शेती आणि पाणीसाठ्याला बसण्याची शक्यता आहे. पिके हातात येण्याच्या वेळीच पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा धोक्याचा इशारा या नव्या अंदाजात देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसू शकतो, असाही अंदाज वर्तवला आहे.
मान्सून सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी
मान्सून सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी असेल असा अंदाज स्कायमेटने एप्रिलमध्ये वर्तवला होता. म्हणजे यंदा पाऊश नेहमीपेक्षा कमी पडेल. पावसाचा अंदाज ९४% वर्तवला होता. एल निनोची स्थिती अधिक तीव्र होणे आणि सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव (IOD) स्थितीबद्दलची अनिश्चितता असल्यामुळे उर्वरित मान्सून हंगामावर परिणाम होण्याची शक्यताही स्कायमेट वर्तवली आहे.
एल निनोची परिस्थिती अधिक तीव्र झाली आहे. त्याशिवाय हिंद महासागर द्विध्रुवाबाबतची अनिश्चितताही वाढली आहे. याचा परिणाम उर्वरित मान्सून हंगामावर होण्याची शक्यता आहे.- स्कायमेट
सप्टेंबरमध्ये पावसाची उघडीप, दुष्काळाची टांगती तलवार
१ जून ते ३१ जुलै दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा १३% कमी पावसाची नोंद झाली आहे. 'स्कायमेट'च्या (Skymet) अंदाजानुसार, ऑगस्टमध्ये सरासरीच्या ८४% आणि सप्टेंबरमध्ये ८०% पाऊस होण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एल निनो'चा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही स्थिती 'तीव्र' श्रेणीतून 'अति तीव्र' (Very Strong) श्रेणीत जाऊ शकते. यापूर्वी २०२३ मध्ये उद्भवलेल्या 'एल निनो'च्या परिस्थितीमुळे मान्सून अनियमित झाला होता. त्यामुळे २०२३-२४ जुलै-जूनमध्ये भारताच्या एकूण धान्य उत्पादनात ६.१% घट झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, भारतीय हवामान विभागाने (IMD) २०२६ च्या नैऋत्य मान्सून पावसाचा अंदाज ९२% वरून कमी करून दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) ९०% वर आणला आहे.
सरकारी हवामान कार्यालयाने काय सांगितले?
IMD च्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर कालावधीत पाऊस सरासरीच्या ९४% पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. भारताला चार महिन्यांच्या मान्सून हंगामात वार्षिक पावसापैकी ७५-८०% पाऊस मिळतो. हा देशाच्या एकूण धान्य उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक असतो.
ऑगस्ट-सप्टेंबर कालावधीत पर्जन्यमान वार्षिक सरासरीच्या ९४% पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.- आयएमडी
भात आणि कापसावर परिणाम होऊ शकतो
भात, कापूस, कडधान्ये आणि तेलबिया यांसारख्या प्रमुख मान्सून किंवा खरीप पिकांसाठी पाऊस आणि वेळ महत्त्वाचा असतो. कारण पावसातील कोणत्याही चढ-उताराचा पेरणीच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रासारख्या राज्यात पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.