Hari Narke
Hari Narke saam tv news
महाराष्ट्र

"OBC राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा देशातील 11 लाख लोकांना फटका बसणार"

साम टिव्ही ब्युरो

कल्याण : ग्रामपंचायती,पंचायत समित्या ,जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांना पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे निवडणुका (Election Pending) प्रलंबीत आहेत.या पार्श्वभूमीवर निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दोन आठवड्यांमध्ये घोषित करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) दिले आहेत.त्यामुळे ओबीसी आरक्षणाचं काय होणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे.यावर इतिहास साहित्यिक आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण (obc political reservation) रद्द झाल्याचा देशातील 11 लाख लोकांना फटका बसणार असून महाराष्ट्रातील 56 हजार जणांची पदे धोक्यात आहेत.केंद्र आणि राज्य सरकारने दोन्ही बाजूंनी काही ना काही अडचणी निर्माण केल्यामुळे भटक्या विमुक्तांनाही याचा फटका बसतोय.असं वक्तव्य हरी नरके यांनी केलं आहे.

या विषयावर पुढे बोलताना हरी नरके म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानंतर 2486 ग्रामपंचायत पंचायत, समित्या जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिकामधील ओबीसी आरक्षण हे सध्यातरी शून्यवत झालेला आहे.ओबीसी आरक्षणाबाबत गेल्या वर्षी मार्चपासून चौदा महिन्यामध्ये जेवढे निकाल आले, ते विरोधात गेलेले आहेत. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण एक प्रकारे धोक्यात आले आहे.महाराष्ट्रमधील 56 हजार जणांची पदेही धोक्यात आहेत.देशात 11 लाख लोकांना ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसणार आहे.सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश असल्यामुळे याच्या पुढे काही दिसत नाही.

आता राज्य शासन काय करते, हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. तर ओबीसी आरक्षणाबाबत राजकीय अनास्था असल्याचा आरोप होतोय. याबाबत बोलताना राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवतेय तर केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवतेय. दोन्ही बाजूंनी काही ना काही अडचणी निर्माण केल्या आहेत. याची शिक्षा मात्र भटक्या विमुक्तांना बसतेय अशी खंत नरके यांनी व्यक्त केली .महावितरणच्या कल्याण परिमंडलात गुरुवारी सायंकाळी चार वाजता महापुरुषांची संयुक्त जंयती साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने संयुक्त जयंती उत्सव समितीकडून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले हरी नरके ?

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली.असं औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे हे प्रभावी आणि लोकप्रीय वक्ते आहेत.मात्र त्यांना जो कोणी माहिती देत आहे,त्यांनी ती माहिती तपासून घेतली पाहिजे.त्यामुळे लोकमान्य टिळकांनी रायगडावरी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली हा वाद वाढविण्यात काही अर्थ नाही. असे मत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा.हरी नरके यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Problem: फोन सतत गरम होतोय? या सोप्या ट्रिक्स वापरा

International Dance Day 2024: भारतातच नव्हे तर जगभरातही प्रसिद्ध आहेत हे शास्त्रीय नृत्य; जाणून घ्या

Uday Samant : छत्रपतींच्या गादीचा अपमान कोणी केला? बुधवारी कोल्हापुरात सगळं उघडं करणार : उदय सामंत

Sairat Movie: सुपरहिट सैराटला ८ वर्ष पूर्ण! आर्चीने शेअर केले कधीही न पाहिलेले खास फोटो

Sabudana Benefits: साबुदाणा आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा फायदे

SCROLL FOR NEXT