तीन दिवसांच्या नवजात बालिकेला उंदरानं कुरतडलं, सरकारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार

रुग्णलयातील दोन परिचारीकांना निलंबीत करण्यात आलं असून पुढील चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलीय.
Rat bite
Rat bitesaam tv

गिरी : झारखंडच्या गिरी जिल्ह्यातील एका शासकीय रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बालिकेला (Rat bite) उंदराने कुरतडलं आहे. उंदाराने घेतलेल्या चाव्यामुळे बालिका गंभीर जखमी झाली आहे.त्यामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.या प्रकरणी रुग्णलयातील दोन परिचारीकांना निलंबीत (two nurse suspended) करण्यात आलं असून पुढील चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलीय.नवजात बालिकेला उंदराने कुरतडल्याची घटना गिरी जिल्ह्यातील सादर रुग्णालयता (Giridih Sadar hospital) २ मे ला घडली होती. त्यानंतर नवजात बालिकेला धनबादच्या शाहिद निर्मल माहतो मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती धनबादच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

Rat bite
अखेर न्याय झाला! ग्रीष्मा वेकारियाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा

"गिरी रुग्णालयाच्या चाईल्ड केयर सेंटरच्या वॉर्डमध्ये मुलीला पाहायला गेली होती. त्यावेळी माझ्या मुलाला उंदारानं कुरतडलं असल्यांचं मला दिसलं.उंदराच्या कुरतडल्यामुळे मुलाच्या डोफ्याला मोठी जखम झाली." अशी माहिती बालिकेच्या आई ममता देवी यांनी दिली आहे. २९ एप्रिलला जन्म झाल्यानंतर बालिकेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने एमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बालिकेला कावीळचा आजार झालं असल्याचंही रुग्णालयतील आरोग्य अधिकाऱ्यांनी ममता यांना सांगितलं होतं. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा प्रशसनाने डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे.

कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाला पाठवलं पत्र

गिरीचे उपायुक्त नमन लकरा म्हणाले की,या गंभीर घटनेत गिरी सादर रुग्णालयातील दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी झारखंडच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे.याप्रकरणी दोन पारिचारीकांना आणि सफाई कामगाराला निलंबीत केलं आहे. चौकशी अहवाल सादर झाल्यावर दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com