अखेर न्याय झाला! ग्रीष्मा वेकारियाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा

सुरतच्या पासोदरा येथे झालेल्या ग्रीष्मा वेकारियाच्या हत्येप्रकरणी (killing) न्यायालयाने मारेकऱ्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Surat Crime
Surat Crime Saam Tv
Published On

सुरत : सुरतच्या पासोदरा येथे १२ फेब्रुवारी दिवशी झालेल्या ग्रीष्मा वेकारियाच्या हत्येप्रकरणी (killing) न्यायालयाने मारेकरी फेनिल गोयानी याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश विमल के. मनुस्मृतीचा एक श्लोक वाचून पुढील निर्णयाला सुरुवात केली. "शिक्षा देणे सोपे नाही, परंतु दुर्मिळ प्रकरणांमध्येही हे दुर्मिळ आहे," असे व्यास म्हणाले.

हे देखील पाहा-

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुरत, गुजरातमध्ये (gujarat) २१ वर्षीय ग्रीष्मा वेकारियाची गेल्या १२ फेब्रुवारी दिवशी प्रियकराने अकारण प्रेमात जाहीरपणे हत्या (killing) करण्यात आली होती. ही घटना घडत असताना मुलीचा काकाही घटनास्थळी उपस्थित होता, त्यांनी भाचीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रियकराने तिच्यावर देखील हल्ला केला आहे. या अपघाती हत्येने संपूर्ण गुजरात हादरला आहे. या प्रकरणात ग्रीष्माच्या हत्येशिवाय आरोपी फेनिल हा खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातही दोषी आढळला आहे.

Surat Crime
युक्रेनकडून T-90 रणगाडा उद्धवस्त; रशियाचा दावा, देशाची चिंता वाढली!

ही हत्या सार्वजनिकरित्या करण्यात आली होती. त्यामुळे ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. या व्हिडिओ (Video) फुटेजच्या आधारे हत्येच्या आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायमूर्तींनी न्यायालयात (court) निकाल सुनावताना, आरोपींनी ही घटना अतिशय क्रूर पद्धतीने केली आहे. दोन्ही बाजू ऐकून आणि सर्व पुरावे तपासून न्यायालयाने फेनिल गोयानी यांना २१ एप्रिल दिवशी दोषी ठरवले होते. त्यानंतर गोयानी यांना आयपीसी कलम ३०२ सह विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले होते. या खटल्यातील निकालानंतर आज आपल्या मुलीला न्याय मिळाल्याचे ग्रिष्मा वेकारियाच्या वडिलांनी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com