Political Earthquake in Buldhana Saam
महाराष्ट्र

अजित पवार गटाकडून काँग्रेसला जबरी धक्का; ज्येष्ठ नेत्याचा रामराम, ४० वर्षांची सोडली साथ

Political Earthquake in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला जबर धक्का. लोणारचे रहिवासी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Bhagyashree Kamble

  • बुलढाण्यात काँग्रेसला पुन्हा जबर धक्का.

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस सेवादलाचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेसची साथ सोडली.

  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश धुमाळ यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिसेंबर महिन्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील. आचारसंहिता लागू झाली असून, सध्या प्रत्येकाला आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशातच बुलढाण्यात मात्र राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे

ऐन निवडणुकीच्या तोंडावर बुलढण्यात काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेस सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमाळ पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. धुमाळ यांनी काँग्रेस पक्षाकडे राजीनामा सोपवला आहे.

प्रकाश धुमाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. मुंबईतील कार्यलयात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल पटेल यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह इतर नेते उपस्थित होते. प्रकाश धुमाळ हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाचा पुरस्कार केला. माजी केंद्रीय मंत्री, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

धुमाळ यांनी संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. जिल्ह्याचे काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे संघटन सचिवसह विविध ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश धुमाळ यांच्या काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. तसेच बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास कामं जरूर करा

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

Lagnanantar Hoilach Prem : पार्थ पुन्हा काव्याच्या गळ्यात घालणार मंगळसूत्र; डिझाइनही आहे खूप खास, पाहा VIDEO

Biryani Recipe: बासमती तांदळाची व्हेज बिरयानी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT