Selfie Side Effects Saam Tv
महाराष्ट्र

Selfie Side Effects : काय सांगता! सेल्फी घेतल्याने स्त्रियांचा आनंद होतो कमी, नैराश्यही वाढते

नैराश्यही वाढते आणि मानसिक आरोग्यावरही होतोय परिणाम; फिल्टर लावून घेतलेला सेल्फी वारंवार पाहिल्याने देखील वाढते स्वतःबद्दल नकारात्मकता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar : आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान विकसित होतय. प्रगतिशील जगात सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे केला जातोय. यात महिलांमध्ये फोटो काढून अपलोड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र त्यांची हीच सवय त्यांना नैराश्यात ढकलत असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे.

आजच्या युगात मोबाईल सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढला आहे विशेषता महिलांमध्ये फोटो काढताना फिल्टरचा वापर सर्रास केला जातो मात्र त्यामुळे नैराश्य येत असल्याचं धक्कादायक वास्तव्य मानस उपचारातज्ञांनी व्यक्त केलय. (Latest Marathi News)

त्यामुळे आपल्या कामावर आणि दैनंदिन जीवनावर सतत त्याचा परिणाम दिसून येतो. सोशल मीडियावर (Social Media) महिलांमध्ये सेल्फी काढून अपलोड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र त्यांची हीच सवय त्यांना नैराशात ढकलत असल्याचा एका अहवालातून उघड झाला आहे. अनेक वेळा सेल्फी काढल्यावर त्याची तुलना इतरांसोबत केली जाते.

आपल्यापेक्षा इतर कोणाचं चांगला फोटो असला तर, आपण तसे का नाही? असा विचार महिलांच्या डोक्यात गोंगावू लागतो. त्यामुळे लक्ष विचलित होऊन मानसिक ताण वाढल्याचा अनुभव महिलांना येत असतो.

मोबाईल (Mobile) मधील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत, त्यात वापरण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे वेगवेगळे फीचर्स तरुणांना आकर्षित करतात. मोबाईल कॅमेऱ्यात काढलेला फोटो, त्याला वेगवेगळे फिल्टर लावून बदलणे शक्य होतं. त्यामुळे आपण कसे चांगले दिसू याकडे आजच्या तरुणाईच लक्ष असतं.

विशेषतः मुली फोटो काढल्यावर त्याला वेगवेगळे फिल्टर वापरून, आपण किती सुंदर आहोत हे भसवण्याचा प्रयत्न करतात. मात्र असं असताना आपण प्रत्यक्षात असे का नाही ? असा विचार त्यांच्या मनात फिरत असतो. त्यात आपल्या सोबतच असलेल्या परिचित व्यक्तीचे फोटो पाहून त्याबाबत देखील मोठ्या प्रमाणात तुलना केली जाते.

आधीच महिलांमध्ये कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींचा ताण असतो, त्यात मोबाईल फोटो आणि त्यासाठी वापरण्यात लावलेले फिल्टर, यामुळे ताण येण्यास भर पडते. मुलगी असली तर ती सुंदरच असते हे संकल्पना घातक असल्याचं मत देखील मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

आजच्या युगात व्यक्तीचा अर्धा वेळ सोशल मीडिया वर घालवला जातो. त्यात समाज माध्यम दिवसेंदिवस आपल्या मनावर ताबा मिळवत असल्याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. विशेषतः महिलांमध्ये या बाबींचा सखोल परिणाम होत असल्याचं काही अहवालातून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर सोशल मीडिया सांभाळून हाताळायला हवा.

समाज माध्यम ही माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयुक्त असतात. इतकच नाही तर संवाद साधण्यासाठी देखील हे उत्तम साधन आहे. मात्र त्यात कशा पद्धतीने आपण आपलं मानसिक आरोग्य सांभाळू शकतो हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे सोशल मीडिया जर काही ठराविक बाबींसाठी वापरला गेला, तर आपल्यासाठी चांगलं असेल हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT