Viral Love Letter : काळानुसार प्रेमाच्या अभिव्यक्तीत बदल होत गेला. कधी काळी प्रेमपत्र लिहून प्रपोज केले जायचे, त्यांनतर फुले आणि अंगठी देऊन प्रपोज करायला सुरुवात झाली. पण हल्लीच्या काळात तर चॅटिंगवरच प्रपोज केले जातात आणि याचे उत्तर देखील चॅटिंगवरच दिले जातात.
पूर्वीच्या काळात एकमेकांना भेटायला लोकं तरसायचे, छोट्या-छोट्या, लपूनछपून केलेल्या भेटींमध्ये प्रेम खुलायचं, पण आता तर व्हिडीओ कॉलमुळे तुम्ही क्षणात एकमेकांना समोर पाहू शकता. (Latest Marathi News)
दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक प्रेमपत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पत्र सुमारे साडेअठरा वर्षांपूर्वी विज्ञानाच्या विद्यार्थ्याने लिहिलेले आहे. प्रेम पत्र लिहीतान आपण जास्तच भावनिक होतो, तशीच काहीशी झलक या पत्रात देखील पाहायला मिळत आहे.
सध्या व्हायरल (Viral) झालेले हे प्रेमपत्र वाचल्यानंतरच लगेच जाणवतं की पत्र लिहीणारी ही व्यक्ती विज्ञान शिकणारी आहे. घराची साफसफाई करताना एका महिलेला हे पत्र सापडले. या महिलेच्या पतीने तिला हे पत्र लिहिले आहे. ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज मी काही जुने सामान साफ करत असताना मला जुनी पत्रे सापडली, जी अय्यरने मला सुमारे 18.5 वर्षांपूर्वी लिहिली होती. पण आपल्या प्रेमिकेला लिहिलेल्या प्रेम पत्रात तपशीलवार आकृत्यांसह प्रयोगशाळेतील प्रयोगांसारख्या गोष्टी कोण लिहितं हो ? हो, मी याच व्यक्तीला होकार दिला होता ! ‘ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
लिहीली होती रोमँटिक कविता
या पत्रात एक रोमँटिक कविता लिहिली आहे, ‘मेरे आराम करने की उम्मीदों का मैंने अपने हाथों से गला घोंट लिया. हम तो लुट गए खड़े ही खड़े.’ असे त्यात म्हटले आहे. एवढंच नव्हे तर त्या पत्रात काही एक्सपेरिमेंट्स बद्दल लिहीले असून ते समजावण्यासाठी एका डायग्रामही काढण्यात आला आहे.
सोशल मीडियावर लोकांकडून या पत्राला खूप पसंती मिळत आहे. एका यूजरने लिहिले, 'तू खूप भाग्यवान आहेस! शिव कृष्ण तुम्हा दोघांना आशीर्वाद देवो अशा शब्दात एका युजरने भावना व्यक्त केल्या आहेत. तर दुसर्या युजरने म्हटले आहे की ‘ त्याला वाटले असेल, डायग्राम काढूनही ही मुलगी होकार देत आहे! तिला कधीच दूर जाऊ द्यायला नको.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.