जिवापेक्षा सेल्फी महत्वाचा ? अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

जिवापेक्षा सेल्फी महत्वाचा ?

गोसेखुर्द धरणाच्या पाण्यात उतरून सेल्फी घेण्याच्या नादात दोन भावंडांचा पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात बुडून जाण्याची घटना समोर आली आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : पाण्याच्या प्रवाहात उतरून सेल्फी काढत असताना दोन्ही भावंडे घसरून पाण्यात बुडाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द पावर हाऊस मध्ये घडली आहे. ह्या दोन्ही भावडांचा पवनी पोलिसांद्वारे शोध सुरु आहे.

हे देखील पहा -

विनोद मधुकर जुनघरे (वय 35) व मंगेश मधुकर जुनघरे (वय 37) दोघेही रा.रेवतकर ले आऊट उमरेड जिल्हा नागपूर असे बुडालेल्या युवकांची नावे आहेत. आज 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असल्याने नागपुर जिल्हाच्या उमरेड वरुण दोन भाऊ आपल्या मित्रासोबत गोसेखुर्द धरणाकडे फिरण्यासाठी आले होते. दरम्यान गोसीखुर्द पावर हाऊस जवळ येत सेल्फी च्या मोह आवरता न आल्याने विनोद पाण्याजवळ उतरला.

दरम्यान विनोदचा पाय घसरल्याने गोसेखुर्द धरण परिसरातील वैनगंगा नदी प्रवाहात तो वाहून जाऊ लागला. मोठ्या भावाला हे कळताच मंगेश ने उडी मारत विनोदला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तो देखील नदीत वाहून जाऊ लागला. पवनी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या दोघांचाही शोध सुरु केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT