ATS operation Maharashtra  
महाराष्ट्र

ATS ची राज्यात मोठी कारवाई! नवी दहशतवादी संघटना फोफावण्यापूर्वीच खेळ मोडला, उच्चशिक्षित तरुण होते निशाण्यावर

ATS operation Maharashtra : महाराष्ट्र ATS कडून यवतमाळ, अहिल्यानगर परिसरात केलेल्या गोपनीय कारवाईत कथित अतिरेकी भरतीचे धागेदोरे समोर. पाच महिन्यांच्या तपासानंतर मोठा कट उधळल्याची माहिती.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

ATS raid details in Yavatmal and Ahilyanagar : राज्यात तीन दिवसांपूर्वी एटीएसने (ATS) केलेल्या गोपनीय कारवाईत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. उच्चशिक्षित तरुणांना अतिरेकी संघटनेत सहभागी करून घेण्याचा आणि एक नवी दहशतवादी संघटना निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. मात्र, एटीएसने केलेल्या कारवाईमुळे या संघटनेचा डाव उधळला गेला आहे. देशविरोधी कृत्य आणि संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएसने ही गोपनीय कारवाई केली.

तब्बल पाच महिन्यांपासून एटीएसचे या हालचालींकडे लक्ष होते. अखेर १४ फेब्रुवारीला एटीएसने काही भागांना लक्ष्य केले. यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेडसह अहिल्यानगर (अहमदनगर) भागात एटीएसने गोपनीय पद्धतीने छापे टाकले. १४ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सलग १५ फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत ही कारवाई सुरू होती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड भागात १७ ठिकाणी, तर अहिल्यानगर भागात १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

एटीएसची एकूण २० पथके १४ फेब्रुवारीच्या रात्रीपासून उमरखेड आणि पुसदमध्ये तळ ठोकून होती. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आली होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची सुमारे १८ पथके दाखल झाली होती. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह आयपीएस अधिकारीदेखील उपस्थित होते. अत्यंत गोपनीय पद्धतीने एटीएस पथकाकडून चौकशी सुरू होती. स्थानिक लोकांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या उच्चशिक्षितांच्या घरांवर एटीएसने छापे टाकले. काही उच्चशिक्षित तरुण अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. गेल्या पाच महिन्यांपासून एटीएसचे पथक या कारवाईची तयारी करत होते. एक नवी दहशतवादी संघटना निर्माण होण्यापूर्वीच एटीएसने ती उद्ध्वस्त केली, असे आता म्हणता येईल. या कारवाईदरम्यान काही उच्चशिक्षित तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. शहरातील तसेच ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांना अतिरेकी संघटनेत सहभागी करून घेण्याचा या संघटनेचा डाव होता, अशी माहिती एटीएसमधील सूत्रांनी दिली आहे.

काही उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी या संघटनेने मोठा कट रचल्याचे कारवाईतून दिसून आले. या तरुणांचा रस ओळखून त्यांना प्रोत्साहित करून संघटनेत भरती करण्याचा प्रयत्न होता. मात्र, पुसद, उमरखेड आणि अहिल्यानगर भागात टाकलेल्या छाप्यांमुळे एक मोठे दहशतवादी कनेक्शन उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. या संघटनेने खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना विशेष लक्ष्य केले होते. काही गरीब आणि श्रीमंत घरातील मुस्लिम तरुणांना खेळाच्या नावाखाली महाराष्ट्राबाहेर पाठवण्यात आल्याची माहितीदेखील मिळत आहे. या कारवाईत पथकाने अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Milk : दूध फाटलं? नो टेंन्शन! 'अशा' ५ प्रकारे करा वापर, भन्नाट ट्रिक आताच लिहून घ्या

Chhatrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रं पाहिलीत का? बघा जगभरातील वस्तूसंग्रहालयात जतन केलेली चित्रं

Ajit pawar Death : रोहितची काळजी वाटते, सरकारने सुरक्षेची जबाबदारी घ्यावी; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kalyan : कल्याणमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, दोघे गंभीर जखमी; परिसरात तणावपूर्वक वातावरण

SCROLL FOR NEXT