सोलापूर जिल्ह्यातील 4332 शाळांची वाजली घंटा!  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील 4332 शाळांची वाजली घंटा!

ओमीक्रॉन व्हेरिएंटचा धोका असताना ही जिल्हा प्रशासनाने दिले पहिली ते सातवी वर्ग सुरु करण्याचे निर्देश

विश्वभूषण लिमये

सोलापूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे बंद असणाऱ्या प्राथमिक शाळा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. ओमीक्रॉन व्हॅरिएंटच्या धोक्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमाचे पालन करत शाळा सुरु करण्याला परवानगी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4332 प्राथमिक शाळा यामुळे आजपासून सुरु होत आहेत.

हे देखील पहा-

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझेशन या नियमांचे कडेकोट पालन करून, आजपासून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विदयार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मागील दीड वर्षांपासून हरवलेला जिवंतपणा पुन्हा नव्याने शाळांमध्ये परतला आहे.

विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले आहे. महापालिका शाळेमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. विद्यार्थ्यांना रिक्षा, कारमधून आणून प्रवेशोत्सव साजरा केला. काही शाळांमध्ये वृक्ष लागवड औक्षण करून विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

SCROLL FOR NEXT