शाळा सुरू, बस बंद ! अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

शाळा सुरू, बस बंद ! शाळेत जायचं कसं? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सवाल

ग्रामीण भागातील एसटी बसच्या फेऱ्या अद्यापही बंद आहेत.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : उद्यापासून राज्यातील शाळा सुरू School Start होणार आहेत. मात्र ग्रामीण भागातील मुलांनी शाळेला जायचं कसं हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ग्रामीण भागातील एसटी बसच्या ST Bus फेऱ्या अद्यापही बंद आहेत. अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात दररोज 20 फेऱ्या जातात यापैकी सध्या एकही सुरू करण्यात आलेली नाही. (School starts but bus don't start How to go to school)

हे देखील पहा -

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे Corona Pandamic गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण Rural of Akola district आणि शहरी भागांतील बहुतांश माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार आहेत. या शाळांमध्ये शेजारच्या अनेक गांवामधून विद्यार्थी बसने शाळेसाठी ये-जा करत असतात. मात्र अनेक ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वाभूमीवर बंद केलेल्या ग्रामीण भागातील बससेवा अजूनपर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. मुलींच्या पुढील शिक्षणात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने गेल्या दहा वर्षांपासून मानवसेवा अंतर्गत गांव-खेड्यांमध्ये बससेवा सुरू केल्या आहेत. या बससेवांमधून नजीकच्या माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीनी जात असतात.

उद्यापासून राज्यभरातील शाळा सुरु करणार असल्याच राज्य सरकारने घोषित केलं आहे मात्र आता अजूनपर्यंत मानवसेवा बससेवा सुरू न झाल्याने या विद्यार्थ्यांना पायी अथवा खाजगी वाहनाने जावे लागणार आहे. माध्यमिक आणि आश्रम शाळा सुरू होणार आहेत. या शाळांमध्ये परिसरातील शेकडो विद्यार्थी एसटी बसच्या माध्यमातून शाळांमध्ये ये-जा करत असतात मात्र ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्याने आता बससेवाही सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT