कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांचा हिंगोली दौरा!
कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांचा हिंगोली दौरा! SaamTV
महाराष्ट्र

कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांचा हिंगोली दौरा!

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता असतानाच राज्यातील अनेक मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुटवताना दिसत आहेत, अशातच आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी देखील कोरोनाच्या नियमांना मोडीत काढलं आहे. (School Minister Varsha Gaikwad's visit to Hingoli)

हे देखील पहा-

आज वर्षा गायकवाड हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यावेळी औंढा तालुक्यातील सिध्देश्वर गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मात्र या भूमिपूजनाला जायच्या आधी कोरोनाचे सर्व नियम मोडून शेकडो मोटार सायकल चालक वर्षा गायकवाड यांच्या स्वागतासाठी रॅली (Rally) घेऊन उपस्थित होते, वर्षा गायकवाड यांच्या ताब्यात पोलिसांसह अनेक शासकीय अधिकारी देखील हजर होते, मात्र असे असताना या रॅली मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले, त्या मुळे जनतेला नियम पाळण्याची आवाहन करणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांना नियम लागू नाहीत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना येत्या दोन महिण्यांमध्ये व्यक्त करत असतानाच त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री असे वागू लागले तर जनतेने कोणाला जाब विचारायचा असा सवाल उपस्थित होत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT