School Holiday Saam Tv
महाराष्ट्र

School Holiday: यंदा दिवाळीच्या सुट्ट्या फक्त १२ दिवस, शाळेच्या सुट्यांची यादी जाहीर

School Holiday In Diwali: यंदा दिवाळीत शाळांना फक्त १२ दिवसच सुट्ट्या असणार आहे. शिक्षण विभागाने याआधीच शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांंची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Siddhi Hande

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीत फक्त १२ दिवस सुट्ट्या

१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी

शिक्षण विभागाने जारी केली सुट्ट्यांची यादी

दिवाळी सुरु व्हायला अवघा १ महिना बाकी आहे. दिवाळीत शाळांना किती दिवस सुट्ट्या असणार आहे याबाबत माहिती समोर आली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीत फक्त १२ दिवस सुट्टी असणार आहे. दिवाळीची सुट्टी ही १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. याआधी ही सुट्टी जवळपास २१ दिवस दिली जायची.

यंदा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्या शाळांना १२९ दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये रविवारचा समावेश आहे.त्यात आता १२ सुट्ट्या दिवाळीत दिल्या जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, ५३ सुट्ट्या या रविवारच्या असणार आहे. सण-उत्सवानिमित्त ६७ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षात २२० दिवस अध्यापनाचे असणार आहे.

याचसोबत जवळपास ४४ दिवस उन्हाळी सुट्ट्या असणार आहे. याआधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पहिली ते नववीच्या परीक्षा उरकल्या जायच्या. आता ८ ते २५ एप्रिलपर्यंत या परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता २५ एप्रिलनंतर १४ जून या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे.

आता दिवाळीआधी पहिल्या सत्रातील परीक्षा होणार आहे. याचसोबत उन्हाळी सुट्ट्यांआधी दुसऱ्या सत्रातील परीक्षा होणार आहे. १५ एप्रिलआधी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षातील २२० दिवस हे अध्ययानासाठी देण्यात आले आहेत.

सुट्ट्यांबाबत निर्णय

दिवाळीची सुट्टी फक्त १२ दिवसांची

२ मेपासून ते १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या

८ ते २५ एप्रिलपर्यंत होणार परीक्षा

दिवाळी सुट्ट्यांपूर्वी पहिल्या सत्रातील परीक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT