Crime News
Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती; बाप आणि काकाने मुलीच्या प्रियकराला संपवलं

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या प्रियकराची बाप आणि तिच्या काकाने हत्या केली आहे. वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) तालुक्यातल्या भिवगाव येथे दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. ज्या मुलीवर प्रेम होते, त्याच मुलीच्या बाप आणि तिच्या काकाने हत्या केल्याचं उघड झालं आहे. या घटनेने भिवगावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) हत्येचा गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या भिवगावातील दहावी शिकणाऱ्या मुलाचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत होते. या दोघांचं एकमेकांवर प्रेम (Love) होतं. मात्र, यांच्या प्रेमाची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली. या मुलाने मुलीला मोबाईल देखील गिफ्ट केला होता.

दरम्यान, हा मुलगा २५ तारखेपासून बेपत्ता होता. अखेर आज त्याचा मृतदेह सापडला. मुलाने मुलीला दिलेल्या मोबाईल गिफ्टवरून या हत्येचा उलगडा झाला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दादासाहेब आणि सुनील या दोन आरोपींना अटक केली आहे.

जालन्यात लग्न समारंभातून परतणाऱ्या तरुणांवर चाकू हल्ला 

जालन्यातील कचेरी रोड वरील गवळी मौहल्ला परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास लग्न समारंभाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने धारदार चाकूच्या साह्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

Kalyan Constituency : कल्याणमध्ये शेवटच्या दिवशी ४० उमेदवारांचे अर्ज, अभिजीत बिचुकलेही मैदानात; सगळेच काहीसे बिचकले!

Today's Marathi News Live : अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज भरलाय , माघार घेणार नाही; वैशाली दरेकर यांचा निर्धार

Google Audio Emoji: फोनवर बोलणं होईल आणखी मजेशीर, गुगलने आणलंय नवीन ऑडिओ इमोजी फीचर; कसा करायचा वापर?

SCROLL FOR NEXT