फासे पारधी समाजाने नागपूर- औरंगाबाद हायवेवर भरविली शाळा कारण...
फासे पारधी समाजाने नागपूर- औरंगाबाद हायवेवर भरविली शाळा कारण...  Saam Tv
महाराष्ट्र

फासे पारधी समाजाने नागपूर- औरंगाबाद हायवेवर भरविली शाळा कारण...

अरुण जोशी

अमरावती : फाशी पारधी समाजातील उघड्यावर राहणाऱ्या, भीक मागून खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मतीन भोसले यांनी अमरावती (Amravati) येथील मंगरूळ चव्हाळा येथे प्रश्नचिन्ह नावाची निवासी शाळा (School) सुरू केली. मात्र, समृद्धी महामार्ग या शाळेच्या वाचनालय मधून गेल्याने वाचनालय (Library) तोडण्यात आले आहे . यावेळी मतीन भोसले यांना शासनाकडून काही मदत देखील मिळाली होती.

हे देखील पहा-

मात्र, आज मंगरूळ चव्हाळा (Mangrul Chawla) येथील फाशी पारधी समाजाच्या विद्यार्थी आई- वडिलांनी चक्क नागपूर (Nagpur) औरंगाबाद (Aurangabad) एक्सप्रेस हायवेवर चक्काजाम करून टाकले आहे. आमच्या मुलांना प्रश्नचिन्हची शाळा बांधून द्या, वाचनालय बांधून द्या, अशा विविध मागण्या घेत चक्क विद्यार्थ्यांनी या एक्सप्रेस हायवेवर आपले पुस्तक ठेवून अभ्यास करायला सुरुवात केली आहे.

यादरम्यान एक्सप्रेस हायवेची वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करण्यासदर्भात विनंती केली होती. मात्र, फासेपारधी समाजाचे विद्यार्थी आणि आई- वडील त्या विनंतीला कुठे मान दिला नाही. जोपर्यंत आमची शाळा, वाचनालय, विहीर आणि शौचालय शासन बांधून देणार नाही. तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे, असा इशारा यावेळी प्रश्नचिन्हाच्या विद्यार्थ्यांनी घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Constituency : मावळ मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षांचा भंग, वर्षानुवर्ष सागरी पूल राहिला कागदावरच

Online Payment: 'या' टीप्स वापरा करा तुमचे UPI खातं सुरक्षित

Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू; पुण्यातील भाजप नेत्याला फोनवरून धमकी

Rohit Pawar: व्वा दादा व्वा! गुंडच तुमचा खुलेआम प्रचार करतायेत; आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट

SCROLL FOR NEXT