Maharashtra weather Update News Saam TV
महाराष्ट्र

Rain alert : विदर्भात पावसाचा तांडव! या ३ जिल्ह्यांत 'रेड अलर्ट'; शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी

Vidarbha rain alert : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra weather Update News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या ३ जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पावसाचा हा मोठा धोका आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसना २९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यभरात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, २९ ते ३१ जुलै या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. आज पावसाचा सर्वाधिक प्रभाव पूर्व विदर्भात राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर गुरूवारी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, कोकण, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तर शुक्रवारी मुंबई महानगर प्रदेश, खानदेश आणि घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहील.

विदर्भातील अलर्टची आजची स्थिती

रेड अलर्ट: चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

ऑरेंज अलर्ट: नागपूर, वर्धा, भंडारा

यलो अलर्ट: विदर्भातील उर्वरित सर्व जिल्हे

प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

हवामान खात्याने २९ जुलैसाठी रेड अलर्ट दिल्यानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या व खासगी कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून २९ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, आयटीआय व व्यावसायिक प्रशिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा मोठा धोका आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज २९ जुलै रोजी राज्याच्या विविध भागांत मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव राहणार असल्याने तेथे 'रेड अलर्ट' लागू करण्यात आला आहे. तर नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून उर्वरित विदर्भात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. याशिवाय कोकण, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तुलनेने दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT