School Holiday Saam Tv
महाराष्ट्र

School Holiday: यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या मिळणार? वाचा सुट्ट्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra School Holiday: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळांना सुट्टी किती दिवस असणार याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले होते. सुट्टयांविषयीची संपूर्ण माहिती समोर आली आहे. एका क्लिकवर वाचा...

Priya More

राज्यातील शाळा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील एसएससी बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या शाळा ९ जूनपासून सुरू होणार आहे. शाळा कधी सुरू होणार याची माहिती तर मिळाली पण आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळांना सुट्टी किती दिवस असणार याची देखील महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय शाळांसाठी कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. यामधूनच शाळांना किती दिवस सुट्टी असणार याची देखील माहिती समोर आली आहे. या कॅलेंडरनुसार या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांना एकूण १२९ दिवस सुट्ट्या असणार आहेत. तर २३६ दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या १२९ दिवस असणार आहे. या वर्षात ५३ रविवार येतात. या सुट्ट्यांमध्ये इतर सार्वजनिक सुट्ट्या, सण आणि नियोजित विश्रांतीच्या दिवसांचा देखील समावेश आहे. या सुट्ट्या विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळणार आहे. सुट्ट्यांची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक उत्सुक होते अखेर ते कॅलेंडर आले.

दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरू होणार याची तारीख काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. राज्यातील २५ जिल्ह्यांमधील शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. तर विदर्भातील अमरावती आणि नागपूर या विभागांमधील शाळा २३ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भात जून महिन्यात सुद्धा तापमान जास्त असते त्यामुळे यठिकाणच्या शाळा उशिराने सुरू होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

SCROLL FOR NEXT