Maharashtra School: शाळांच्या घंटा वाजणार! राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? समोर आली तारीख

SSC Board School Reopen: राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. सीबीएसई आणि एसएससी बोर्डाची शाळा कधी सुरू होणार याची तारीख समोर आली आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra School: शाळांच्या घंटा वाजणार! राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? समोर आली तारीख
Maharashtra School Saam TV
Published On

महाराष्ट्रातील शाळांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष शाळा कधी सुरू होणार याकडे लागले आहे. अशात राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याची तारीख समोर आली आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर एसएससी बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी तयारीला सुरूवात करावी.

Maharashtra School: शाळांच्या घंटा वाजणार! राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? समोर आली तारीख
10th SSC Result: दहावीचा निकाल जाहीर! नागपूर तळाशी, कोकणने परंपरा राखली; पाहा कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल लागला

नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेत परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधी प्रवेशप्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.

राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात. दरवर्षी विदर्भात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जून महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात तापमान असते. त्यामुळे विदर्भातील शाळा उशिराने सुरू होतात.

Maharashtra School: शाळांच्या घंटा वाजणार! राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? समोर आली तारीख
Mumbai Marathi School: मुंबईत १० वर्षात १०० मराठी शाळा बंद; मराठी भाषा जगणार कशी?

सीबीएसई बोर्डाची शाळा १ एप्रिलपासूनच सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. आता त्यांच्या उन्हाळी सुट्टी देखील लवकरच संपणार आहे. सीबीएसई बोर्डाची पहिली ते दहावीची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शाळेत जाण्याच्या तयारीला सुरूवात केली आहे.

Maharashtra School: शाळांच्या घंटा वाजणार! राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? समोर आली तारीख
ZP School : जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घर व पाणीकर माफ; भडगाव ग्रामपंचायतचा अनोखा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com