Aaditya Thackeray vs Eknath Shinde Group Saam Digital
महाराष्ट्र

Thackeray vs Eknath Shinde Group: गुजरात, दिल्लीतून मुंबईची लूट, BMC तील घोटाळा CM शिंदेंमुळेच; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

Thackeray vs Eknath Shinde News: मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्याला पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असून कित्येक कोटींचा रस्ते घोटाळा झाला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

Sandeep Gawade

Thackeray vs Eknath Shinde Group

मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्याला पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असून कित्येक कोटींचा रस्ते घोटाळा झाला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे मंत्री असताना आणि कोरोना काळात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना लिहिलल्या पत्रांवर आज भाष्य केलं आहे.

स्ट्रीट फर्नीचर बाबत दोन आठवड्यांपूर्वी लोकायुक्तांना पत्र पाठवलं होतं, त्यांच उत्तर आज आलं आहे. मला आणि आयुक्तांना बोलावल आहे. अपेक्षा आहे आयुक्त येतील. सरकारने दावा केला होती की चौकशी सुरू आहे. पण त्याचं पुढे काय झालं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपच्या आमदाराने दावा केला होता की कंत्राट रद्द झाली. पण तरीही २०-२२ कोटी देण्यात आले आहेत. कंत्राट रद्द झाली असतील तर मग पैसे का दिले. MTHL च काम ८५ टक्के पूर्ण झाल होत पण स्वतः च्या स्वार्थासाठी दिड महिना उशिर केला. त्यावेळी रोड घोटाळ्यात पालिकेने ४०० कोटी रुपयांची कंत्राटी रद्द केली. १००० हजार कोटी रुपयांहून अधीक पैसे वाचवले आहेत. मात्र गेल्या १ वर्षात १ एफडीआय चा पैसा राज्यात आला नाही. दिघा स्थानक ८ महिने झाले तय्यार आहे पण उद्घाटनासाठी व्हीआयपी चा वेळ मिळाला नाही. दिल्लीश्वरांकडून लूट सूरू आहे. सूरत, अहमदाबाद गुजरातचे लोक त्यात सामील आहेत. मुख्यमंत्री भाजपची स्क्रिप्ट वापरत आहेत. त्यांची तेवढीच पोच आहे तेवढच ते करतायेत.

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत देखील आता सीजेआय नाही आहेत. संसदेच्या प्रकरणात सरकारला स्टेटमेंट देता आलं असतं. मात्र तसं झालं नाही. संसदेच्या प्रकरणाचं समर्थन नाही पण संसदेत घुसखोरी झालीच कशी याची चौकशी झाली नाही. ज्याच्या पासावर ते आले त्याची साधी चौकशी पण नाही.नोकऱ्या नाहीत म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं त्याचा देखील गांभीर्याने विचार करायला हवा. भाजपचा राममंदिराशी आतातरी काडीमात्र संबध नाही. २०१९ मध्ये कोर्टाच्या निर्णयामुळे मंदिर बनतंय.

महाराष्ट्र सगळ्यात भ्रष्ट राज्य झालंय. मुख्यमंत्री आता आईस्क्रीम पण टेंडर कोकोनट आईस्क्रीम खातात. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन भरवणार आहे पण तोवर ते रहाणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT