Sharad pawar SaamTV
महाराष्ट्र

सावरकरांच्या कार्याची तुलना होऊ शकत नाही, त्यांचं लिखाण अजरामर; पवारांचे गौरोद्गार (पहा Video)

'सावरकर सर्वांच्या मनात असून सावरकरांचे लिखाण अजरामर आहे. त्याची तुलना होवू शकत नाही. कुसुमाग्रज यांचे कार्य ही महान मग वाद कशासाठी.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या भाषणामध्ये स्वात्र्यंवीर सावकरांच्या (Savarkar) विषयी गौरोद्गार काढले आहेत. 'सावरकरांचं योगदान मोठ आहे. त्यांच्या सावरकरांच्या कामाची तुलना होऊ शकत नाही.' असं पवार आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

मागील काही दिवसांपासून सावकरांच्या भुमित साहित्य संमेलनामध्ये सावरकरांना डावललं जात असल्याचा आरोप अनेक नेतेमंडळींसह सावरकर प्रेमींकडून करण्यात येत होता. काल खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील साहित्य संमेलनाला पाठ दाखवली होती. 'सावरकरांच नाव साहित्य संमेलनाला का दिलं नाही जिथे सावरकरांचा सन्मान होत नाही अशा ठिकाणी आपण जाणार नाही.' असं त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं.

पहा व्हिडीओ -

दरम्यान याच सर्व वादाच्या पार्श्वभुमीवरती शरद पवार (Sharad Pawar) यांनी सावरकंरांविषयी गौरोद्गार काढले आहेत. पवार आपल्या भाषणात म्हणाले, 'या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी काळाराम मंदिरात केलेल्या सत्याग्रहाचा घणाघात देखील कानी पडतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म इथला भगूरचाच सावरकरांची प्रेरणा अनेकांनी घेतली. जॅक्सनचा वध नाशिकमध्येच झाला. नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी शिवाय सावरकरांच्या कामाची तुलना होऊ शकत नाही. सावरकर सर्वांच्या मनात असून सावरकरांचे लिखाण अजरामर आहे. त्याची तुलना होवू शकत नाही. कुसुमाग्रज यांचे कार्य ही महान मग वाद कशासाठी असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सावरकरांचे नाव खाली जाईल, असं नाशिककर (Nashik) करूच शकत नाहीत असही पवार म्हणाले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाची मत ऐकायला मिळतात. शिवाय सावरकर हे विज्ञानवादी होते त्यांची वादग्रस्त विधान आहे, पण त्यामागे विज्ञान आहे. गायीबाबतचे विधान सावरकर यांनी केलं होतं असही ते म्हणाले. कोकणात मंदिरात पूजेसाठी दलित व्यक्तीची नेमणूक केली. सावरकर यांच्यां नावाला विरोध करण्याचं काम नाशिककर महाराष्ट्रचे लोक करू शकत नाहीत. कुसुमाग्रज यांचे नाव दिले ही त्यांना आदरांजली आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या उद्धरासाठी काम केलं असही पवार आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

Edited By - Jagsidh Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT