एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती साहित्यिक बोलत नाहीत - बाळासाहेब थोरात (पहा Video)

'लेखकांची ताकद मोठी असते, म्हणून जिथं चुकत तिथे लेखकांनी लिहिलं पाहिजे. राजकारण बदलवण्याची ताकद लेखकांमध्ये असते.'
बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरातSaamTV
Published On

नाशिक : आज 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समोरोप प्रसंगी भाषण करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कंगणा रनौतसह विक्रम गोखलेंवरती निशाना साधतच साहित्यिकांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली.

पहा व्हिडीओ -

थोरात आपल्या भाषणामध्ये म्हणाले, 'स्वातंत्र्याची ज्योत गांधींनी आणि टिळकांनी लिखाणातून दिली. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास कोणी पुसू शकत नाही. मात्र एक बाई या स्वातंत्र्याला त्याला भीक म्हणते आणि त्या बाईच्या वक्तव्याला महाराष्ट्रातील एक कलाकार समर्थन देतो मात्र यावरती कोणी साहित्यिक बोललं नाही याचं वाईट वाटलं अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी या साहित्यिकांच्या समोर बोलून दाखवली.

बाळासाहेब थोरात
लोकप्रियतेमुळे नव्हे तर निष्ठावंतांमुळे तुम्ही खासदार; कोल्हेंना आ.मोहितेंचा घरचा आहेर!

तसेच या संमेलनाची सुंदर साहित्य संमेलन म्हणून नोंद होईल. देशात व देशाबाहेर साहित्य संमेलन जाऊन पोहोचलय. नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास संतांची परंपरा पुढे नेण्याचं काम गोदाच्या पाण्यात आणि नाशिकच्या मातीत आहे. लेखकांची ताकद मोठी असते, म्हणून जिथं चुकत तिथे लेखकांनी लिहिलं पाहिजे. राजकारण बदलवण्याची ताकद लेखकांमध्ये असते. भारतात चुकीचं घडत असेल तर लेखकांनी Author जागरूक राहिले पाहिजे त्यावर लिहिलं पाहिजे. कट्टरवाद वाढला आणि त्यातून मते मिळवायचे असे सध्या सुरू आहे. राज्यघटनेप्रमाणे देश चालला पाहिजे यासाठी राजकारणी काम करतात मात्र आम्ही जिथं कमी पडत असू तिथं लेखकांनी लिहिलं पाहिजे असही थोरात आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com