Shivani Wadettiwar
Shivani Wadettiwar Saam TV
महाराष्ट्र

Shivani Wadettiwar on V D Savarkar: विजय वडेट्टीवार यांच्या लेकीने सावरकरांबद्दल केलं मोठं वक्तव्य, राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता...

Satish Kengar

Shivani Wadettiwar on V D Savarkar: अलीकडेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं. आता पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यांनी ''बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे?'', असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या आहेत की, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा त्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

त्या म्हणाल्या एकी, ''हे लोक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर सावरकरांवर मोर्चा काढतात. सावरकरांचे विचार होते, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सुरक्षित वाटेल?''

लेकीच्या वक्तव्यावर काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

शिवानी यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवानी यांनी सावरकरांचं एक पुस्तक वाचून हे वक्तव्य केलं आहे. यावर तीच खुलासा करेल. भाजपने आरोप करण्यापूर्वी आधी संपूर्ण सावरकर वाचावा, असं ते म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Pune Loksabha Election: "तुमच्या तात्याला साथ द्या" वसंत मोरेंची पुणेकरांना आर्थिक मदतची साद

SCROLL FOR NEXT