kokan tourism, guhaghar, satyawan derdekar, house boat saam tv
महाराष्ट्र

Konkan Tourism : काेकणातील पर्यटनासाठी 'हाऊसबाेट' ची संकल्पना; गुहागरच्या युवकाची कल्पकता (पाहा व्हिडिओ)

हाऊस बाेटमुळे कोकणातील पर्यटकांची संख्या वाढेल अशी आशा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- जितेश कोळी

Konkan Tourism : कोकणात (kokan) पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता पर्यटनाचा नवा पर्याय निर्माण झाला आहे. एरवी समुद्रातून किंवा खाडीमध्ये कांदळवन आणि मगर सफर करणाऱ्या पर्यटकांना (tourists) आता खाडीत चक्क वास्तव्य करता येणार आहे. हाेय ! तुमचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. कोकणातील गुहागर (guhaghar) येथील परचुरी गावातील एका युवकाने (youth) चक्क हाऊस बोट (house boat in konkan) तयार केली आहे. केरळनंतर अशी सफर काेकणात मिळणार असल्याने सत्यवान देर्देकर (Satyawan Derdekar) याच्या धाडसाचे आणि कल्पकतेचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.

पर्यटनाचा हंगाम सुरू झाला की कोकणात लाखो पर्यटक दाखल होतात. हिरवी गार झाडे, लांब लचक समुद्र किनारे आणि खाडी किनाऱ्यावर मुक्तपणे वावरणाऱ्या मगरी पाहण्यासाठी आजवर लाखो पर्यटक गुहागर येथे येत असतात. आता या पर्यटकांना हाउस बोटच्या माध्यमातून अशा निसर्गाच्या सानिध्यात खाडीमध्येच रात्र अनुभवता येणार आहे.

परचुरी (parchuri) गावातील रहिवासी असलेल्या सत्यवान दरदेकर या तरुणाने ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून नवा पर्याय निर्माण केला आहे. या आधी सत्यवान गेली दहा वर्षे दाभोळ खाडी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना कांदळवन आणि मगर सफर घडवत पर्यटन व्यवसाय करत आहे.

हाऊस बोटमध्ये असलेल्या आलिशान खोल्या, त्यातून दिसणारे डोळ्याचे पारणे फेडणारे दाभोळ खाडीच सौंदर्य आणि स्वच्छ हवा इथे येणाऱ्या प्रत्येकाला मोहून टाकणारे आहे.

परचुरी हे गाव ग्रामीण भागात असले तरीही या भागात खाडीचा विस्तीर्ण किनारा आहे. विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी देखील या भागात पाहायला मिळतात, याचा फायदा पर्यटनासाठी होऊ शकतो असा विचार करत या युवकाने स्थानिकांना सोबत घेऊन पर्यटन व्यवसाय सुरू केला. यातून स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांना देखील शास्वत रोजगार निर्माण झाला आहे. (Maharashtra News)

गुहागरमध्ये स्वच्छ समुद्र किनारा, हेदवी मधील गणपती मंदिर आणि वेळणेश्वर, अंजनवेल येथील गोपाळ गड किल्ला या व्यतिरिक्त पर्यटकांना भुरळ घालेल अश्या ॲक्टिविटीस तुरळक होत्या. मात्र परचूरीत आता नव्याने निर्माण झालेल्या हाऊस बोट मुळे गुहागर येथील पर्यटन वाढीस त्याचा नक्की फायदा होईल असे चित्र आहे.

हाऊस बोटच्या माध्यमातून कोकणातील वैविध्यपूर्ण असलेले निसर्ग सौंदर्य पर्यटकांना दाखवता आले तर कोकणातील पर्यटकांची संख्या आणखी वाढून इथला पर्यटन व्यवसाय कात टाकेल यात शंका नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT