Santosh Deshmukh Case  Saam tv
महाराष्ट्र

Satosh Deshmukh Case: मारहाणीत मारहाणीत देशमुखांवर 150 वार; कराड गँगनं बनवली होती खास हत्यारं

Satosh Deshmukh Case: बीडचे सरपंच संतोष देशमुखांची कराड गँगने क्रूर हत्या केली. त्यांच्या अंगावर तब्बल 150 वार केले होते. ज्या हत्याऱ्यांनी वार केले होते. त्याचा परीक्षण अहवाल समोर आलाय. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खटला सुरु झाल्यावर धक्कादायक माहिती येत आहे. देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या 4 हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आलाय. वाल्मिक कराड गँगने देशमुखांना मारण्यासाठी हत्यारं बनवली होती. यामध्ये गॅस पाईप, पाईपचा चाबूक, बांबूची काठी, लोखंडी पाईपचा समावेश आहे. या हत्यारांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

देशमुखांना या शस्त्रांनी मारहाण

गॅस पाईप

गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक

लाकडी काठी

लोखंडी पाईप

हैवानालाही लाजवेल अशा अमानूषपणे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. सलग अडीच तास मारहाण करण्यात आली एवढंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करुन मारल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुलेने दिलीय..साक्षिदारांचा जबाब आणि हत्यारांचा परीक्षण अहवाल कराड गँगच्या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पूरक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

SCROLL FOR NEXT