satish ghatge demnads water for jayakwadi dam  Saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी द्या अन्यथा पश्चिम महाराष्ट्रात जाणारा ऊस रोखणार : सतीश घाटगे (पाहा व्हिडिओ)

नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाऊ नये यासाठी शेतक-यांनी लढा उभा केला आहे.

Siddharth Latkar

लक्ष्मण साेळुंके / सचिन बनसाेडे

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला मराठवाड्यातील साखर कारखान्याच्या अध्यक्ष आव्हान देण्याची तयारीत आहेत. (Maharashtra News)

जायकवाडीचा पाणीप्रश्न आता चांगलाच पेटलाय. जलसंपदा विभागाने 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देऊनही पाणी सोडलं जात नाही. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचं साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात यावं यासाठी जालन्यातील समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडीत न सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मराठवाड्यातून जाणारा साडेबारा हजार मेट्रिक टन ऊस रोखणार असल्याचं सांगत मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जाणारे परत बोलावणार असल्याचा इशारा घाटगे यांनी दिला.

त्यामुळे आत्ता पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला देणार मराठवाड्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष आव्हान देणार असल्याने नवा संघर्ष बघायला मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT