satej patil kirit somiaya 
महाराष्ट्र

शांततेत हाेऊ दे सगळं! साेमय्यांच्या दाै-यावर पाटलांचे आवाहन

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करीत आहेत. एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही फिरण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न काेल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे. मंत्री पाटील हे सिंधुदुर्ग दाै-यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना साेमय्यांनी शांतते यावे आणि शांततेत जावे असे आवाहन केले. satej-patil-kirit-somaiya-chipi-airport-wani-yavatmal-accident-latest-news-sml80

जबाबदारी सरकार घेईल

यवतमाळमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. चालकास पाण्याचा अंदाज न आल्याने बस वाहून गेली आहे. त्याठिकाणी काही प्रवाशी पाण्यातून वाहून गेले तर एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. काही प्रवाशांना क्रेनच्या सहाय्याने वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे त्याची जबाबदारी सरकार घेणार असल्याते राज्यमंत्री सतेज पाटील यांनी नमूद केले.

सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न

गतवेळी कलम १४४ लावले होते. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये अशी अपेक्षा होती. आमची त्यांना आत्ता देखील विनंती आहे आपण शांततेत तिथे जावे, भडक वक्तव्य करून जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये असे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी किरीट साेमय्या यांच्या काेल्हापूर दाै-याबाबत म्हटलं.

ते म्हणाले किरीट सोमय्या हे सरकार अस्थिर करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करीत आहेत. एकदा तक्रार दिल्यानंतर परत तुम्ही फिरण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न मंत्री पाटील यांनी उपस्थित केला. याचा अर्थ तुम्ही तिथे पब्लिसिटी स्टंट करीत आहात आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करायची एवढेच करीत आहात. सत्य थोडा उशीराने बाहेर पडते परंतु तोपर्यंत कारण नसताना लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे एक षडयंत्र त्यांनी रचलेले आहे असे मंत्री पाटील यांनी नमूद केले.

महाराष्ट्रालाही कळू द्या

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी कुठेतरी उघडपणे सांगितले पाहिजे हे सगळं आम्ही किरीट सोमय्यांना करायला लावतोय. एकदा त्यांनी समोर येऊन सांगितले पाहिजे महाराष्ट्रालाही कळेल की सुडबुद्धीचं राजकारण होत आहे.

एकत्र येताहेत ही अत्यंत चांगली गोष्ट

विकास कामाच्या दृष्टिने एक चांगला कार्यक्रम सिंधुदुर्गात होत आहे. विमानतळ व्हावे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वप्न पुर्ण हाेत आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असले पाहिजे असे मत राज्यमंत्री सतेज पाटील यांनी चिपी विमानतळावरुन चाललेल्या घडामाेडींवर व्यक्त केले. ते म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी सगळेच जण एकत्र येताहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. शेवटी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल समन्वयाने गेले तर सिंधुदुर्ग जिल्ह्या पुढं येऊ शकतो. एक चांगला कार्यक्रम होईल याची आम्हाला खात्री आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT