Satej Patil/Chandrakant Patil Saam TV
महाराष्ट्र

'बंटी पाटील, माणसं खाणारा माणूस'; चंद्रकांत दादांच्या टीकेला सतेज पाटलांच प्रत्युत्तर म्हणाले...

70 वर्षात काँग्रेसने काय केलं हे सांगायला बिंदू चौकात यायला तयार आहे असं म्हणत सतेज पाटील यांनी भाजपचं आव्हान देखील स्वीकारलं आहे.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Assembly By-Election) भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना दसरा चौकातून निघालेल्या रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे उपस्थित होते.

या वेळी बोलतना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरची निवडणूक बंटी पाटील (Satej Patil) यांनी लादली आहे त्यांना बिंदू चौकात एकत्र सभा घेऊ एकच माईक ठेवू तुम्ही पन्नास वर्षात काय केलं आणि आम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगू, असं आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल आहे.

पहा व्हिडीओ -

तसंच 'बंटी पाटील हा माणस खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध रहावं' या चंद्रकांतदादा पाटलांच्या वक्तव्यावरती काँग्रेस नेते तसंच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी टीकेला उत्तर दिलं ते म्हणाले, 'शिवसेना-भाजप युती असताना 2019 साली सेनेचे उमेदवार कुणी पाडले? गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या (Shivena) पाठीत खंजीर खुपसला शिवसैनिकांना हे सगळं माहिती आहे, भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने अशी टीका केली जातेय, ही निवडणूक लावून मोठी चूक केल्याचं दादांच्या लक्षात आलं आहे.' असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं तसंच 70 वर्षात काँग्रेसने काय केलं हे सांगायला बिंदू चौकात यायला तयार आहे असं म्हणत त्यांनी भाजपचं आव्हान देखील स्वीकारलं आहे.

आज कोल्हापूरात कॉग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT