काेल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी आज (गुरुवार) महाविकास आघाडीचे उमेदवार कॉग्रेसचे विद्यमान आमदार व पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी काेल्हापूरात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif), उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) , आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadravkar) उपस्थित होते. यावेळी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. maharashtra legislative council election 2021
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गतवेळेस भारतीय जनता पक्षाची सत्ता असून देखील त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला हाेता. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची कामे केली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे बंटी उर्फ सतेज पाटलांचा विजय निश्चित असल्याचा दावा मुश्रीफांनी केली. महाविकासचे सर्व नेते सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. सतेज पाटील यांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काॅंग्रेसचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले गतवेळच्या निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत फरक असला तरी आम्ही सत्ताधारी म्हणून जनतेचे काम करुन पालिका, जिल्हा परिषद सदस्यांचा विश्वास संपादन केला आहे. आजच्या घडीला सांगण्यात येणारी संख्या ही दाेन दिवसांत वाढेल. आम्ही २७० पर्यंत आकडा गाठू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान भाजपचा उमेदवार ठरला नसल्याने आत्ता काही बाेलू इच्छित नाही असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.